शहरं
Join us  
Trending Stories
1
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
2
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
3
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
4
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
5
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
6
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
7
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
8
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
9
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
10
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
11
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
12
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
13
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
14
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
15
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
16
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
17
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
18
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
19
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
20
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिटे घेऊन 'नो ग्रेड'चा खेळ; समितीतील सदस्यांची नावे जाहीर, विद्या परिषदेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:40 IST

कॉलेजच्या मूल्यांकनासाठी पाकिटे घेण्याच्या मुद्द्यावरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत गदारोळ

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात अंकेक्षणासाठी गेलेल्या समितीने संस्थाचालकाकडून पाकिटे घेतल्याच्या आरोपावरून विद्या परिषदेत गदारोळ झाला. आरोप झालेल्या समितीच्या सदस्यांची नावे प्रकुलगुरूंनी सभागृहात वाचून दाखवली. त्याचवेळी चाैकशी समितीमध्ये आणखी दोन सदस्यांचा समावेश करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केली.

विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात सोमवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी कुलगुरू होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य डॉ. राजेश करपे यांनी महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी गेलेल्या समितीने पाकिटे घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करा, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची आग्रही मागणी केली. त्याशिवाय कामकाज सुरू होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. त्यावर कुलगुरूंनी ‘लोकमत’ वृत्तपत्र मागवून घेत बातमीचे वाचन केले. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांना खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. सरवदे यांनी चौकशीसाठी समिती नेमल्याची माहिती देत समितीमधील सदस्यांची नावे जाहीर केली. या विषयावर ज्येष्ठ सदस्य डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. प्रसाद मदन यांनी सखोल चौकशीची व समिती निवडताना पारदर्शकपणा पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

समितीत कोण?संस्थाचालकाने पाकिटे घेऊन ‘नो ग्रेड’ दिल्याचा आरोप झालेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठातील प्रा. अभिजित शेळके, वाणिज्य विभागातील डॉ. विलास इप्पर, पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख तथा मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे आणि संगमनेर येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांचा समावेश असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सभागृहाला दिली. दरम्यान, सदस्यांनी संस्थाचालकाचे आरोप फेटाळले.

सभागृहात ‘लाेकमत’ झळकलासंस्थाचालकाने केलेल्या तक्रारीविषयी ‘लोकमत’मध्ये २७ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित झाले होते. त्या दिवशीचा अंकच सदस्य डॉ. राजेश करपे यांनी सभागृहात झळकावला. त्याशिवाय कुलगुरूंकडे सुपुर्द केला.

अधिसभा सदस्यांचेही निवेदनसंस्थाचालकाने केलेल्या आरोपांच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे, प्रा. हरिदास सोमवंशी, शेख जहूर, पूनम पाटील, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, सादिक शेख, दिग्विजय शिंदे आदींनी कुलगुरूंना मागण्यांचे निवेदन दिले.

...तर समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखलचौकशी समितीवर आक्षेप घेतल्यानंतर कुलगुरूंनी त्यात आणखी दोन सदस्यांचा समावेश करण्याची घोषणा केली. त्यानुसार विद्यापीठातील डॉ. सुधाकर शेंडगे आणि प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांचा समावेश करण्यात आला. त्यावर कुलगुरूंनी चौकशी पारदर्शकपणे होण्याची ग्वाही देत समितीने काही गडबड केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असेही स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bribery Allegations Disrupt University Council; Committee Members Named, Investigation Launched

Web Summary : Allegations of bribery against a university audit committee rocked a council meeting. Members' names were revealed, prompting calls for an independent inquiry. The Vice-Chancellor announced an expanded investigation, promising strict action if wrongdoing is uncovered, ensuring transparency.
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र