शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती; शिक्षणव्रती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:59 IST

बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस :‘नीतिधुरंधर’चे थाटात प्रकाशन ; तुकाराम नाट्यगृह खचाखच भरले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात ते ‘ नीतिधुरंधर: बाळासाहेब पवार’ या महावीर जोंधळे लिखित चरित्रगं्रथाचे प्रकाशन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांची यावेळी भाषणे झाली. लेखक जोंधळे यांनी प्रास्ताविक केले.ते व्रतस्थ जीवन जगले....देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा माझा वैयक्तिक परिचय नव्हता; परंतु औरंगाबाद-जालना जिल्ह्यांत त्यांचा वारंवार उल्लेख ऐकायला मिळतो. हरिभाऊ बागडे यांच्या तोंडून तर बाळासाहेबांचे नाव मी सतत ऐकत असतो.पुस्तक वाचल्यानंतर या माणसाची उंची काय होती, याची कल्पना येते. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती न सोडता, स्वत:साठी न जगता, बाळासाहेबांनी नेतृत्वाची एक फळी तयार केली. ते व्रतस्थ जीवन जगले. ते मुख्यमंत्री हटवण्याचे काम करीत होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ते मुख्यमंत्री कसा असावा, नवा मुख्यमंत्री कोण असावा हे ठरवीत होते व त्यासाठी संघर्ष करीत होते.संघर्षातही बाळासाहेब पवार यांचा संयम ढळत नव्हता, हा पैलूही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला. बाळासाहेब पवार हे विलक्षण व अलौकिक लोकनेते होते. मराठवाड्यावर सातत्याने अन्याय झाला, ही खंत उराशी बाळगून ते त्याविरुद्ध लढत राहिले. अनेक सहकारी साखर कारखाने उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला, हे सुरेश प्रभू यांनी नमूद केले. रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेबांचे माझ्यावर कसे प्रेम होते, हे सांगितले व मी काँग्रेसमध्ये यावा यासाठी कसे कसे प्रयत्न केले, यावरही प्रकाश टाकला. विश्वनाथ दाशरथे यांनी गायलेल्या वैष्णव जन तो तेणे कहिए या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व शेवटी जे का रंजले गांजले या भजनाने शेवट झाला. मानसिंग पवार, अजय शहा, किशोर शितोळे, प्रफुल्ल मालानी, जगन्नाथ काळे, आदेशपालसिंह छाबडा, दयाराम बसैय्ये, सुरेश वाकडे, प्रमोद खैरनार व विवेक जैस्वाल आदींनी तुकोबाची पगडी देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. रूपेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.जयंतराव पाटील हे मुख्यमंत्र्यांकडे बघत म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा मुख्यमंत्री हटवण्यात हातखंडा होता. आज ते हयात नाहीत. ( हंशा)रावसाहेब दानवे यावर कोटी न करतील तर नवल! व्यासपीठावर बसलेले जयंत पाटील व विखे पाटील यांच्याकडे बघत ते म्हणाले, बाळासाहेब पवार यांच्यासारखे तुम्ही दोन दोन जण असून काहीही उपयोग नाही. फडणवीस उत्तम काम करीत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र यावर एवढे म्हटले की, बाळासाहेब पवार हे मुख्यमंत्री हटवणारे म्हणणे चुकीचे आहे, तर ते नवा मुख्यमंत्री कसा असावा, असा आग्रह धरणारे होते.