शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार! पावसाअभावी लागवड क्षेत्र घटल्याचे परिणाम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 12, 2023 19:16 IST

जर राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातून बाजरीची आवक झाली तर भाव स्थिर राहतील

छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. राजस्थानातून येणारी बाजरी थोडी काळपट आहे. यामुळे चांगल्या बाजरीला भाव चढणार आहे. हिवाळ्यात गरम बाजरीची भाकरी खाण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. जर राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातून बाजरीची आवक झाली तर भाव स्थिर राहतील, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

बाजरी सध्या ३२ रुपये किलोसध्या बाजारात राजस्थानची जुनी बाजरी विक्रीला येत आहे. ३० ते ३२ रुपये किलोने विकत आहे, तर काळपट बाजरी २६ ते २८ रुपयांपर्यंत विकली जात आहे.

जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र किती ?जिल्ह्यात बाजरीचे एकूण क्षेत्र ३१९०४ हेक्टर आहे. त्यात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र १५३६८ हेक्टर एवढे आहे. म्हणजे यंदा ४८ टक्कांनी पेरणी क्षेत्र कमी झाले आहे.

या जिल्ह्यातून होते आवकछत्रपती संभाजीनगरात आसपासच्या जिल्ह्यातून, तसेच राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातूनही बाजरीची आवक होत असते.

नवीन बाजरीत किती भाववाढ होईलनवीन बाजरीची आवक नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होईल. यंदा पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे बाजरीच्या भावात किलोमागे ३ रुपये भाव वाढतील. सध्या ३२ विक्री होणारी बाजरी येत्या दोन महिन्यांत ३५ रुपये किलोपर्यंत विकली जाईल.-स्वप्नील मुगदिया, व्यापारी

भाव स्थिर राहतीलयंदा राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशात बाजरीचे पीक समाधानकारक आहे. या राज्यातून मोठ्या संख्येने नवीन बाजरी बाजारात आली तर भाव स्थिर राहतील.-प्रशांत खटोड व्यापारी

भाकरी ४० रुपयांपर्यंतसध्या रेस्टाॅरंटमध्ये २० ते ४० रुपयांना एक नग बाजरीची भाकरी मिळत आहे. विशेषत: हॉटेल, ढाब्यावर बाजरीच्या भाकरीला जास्त मागणी असते.

टॅग्स :foodअन्नAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद