शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगरात तीन बंद घरे चोरट्यांनी फोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:57 IST

वाळूज महानगर चोºयांचे सत्र सुरूच असून, शनिवारी चोरट्यांनी बजाजनगरातील तीन बंद घरेफोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

वाळूज महानगर : वाळूज महानगर चोºयांचे सत्र सुरूच असून, शनिवारी चोरट्यांनी बजाजनगरातील तीन बंद घरेफोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनांत चोरट्यांनी जवळपास रोख रकमेसह अडीच लाखांचा ऐवज लांबविला आहे.

दोन दिवसांपूर्वीच सिडको वाळूज महानगरातील स्वप्नील कुलकर्णी यांचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी जवळपास २ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी बजाजनगरात पुन्हा एक घर चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली. दीपक ज्ञानदेव सरोदे (रा. शिवकृपा हौसिंग सोसायटी) हे दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून पत्नी व मुलासह पुण्याला नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान, त्यांचे शेजारी रावसाहेब गावंडे यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले.

त्यांनी सरोदे यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. सरोदे यांनी तात्काळ घर गाठले. घरात प्रवेश करताच साहित्य अस्ताव्यस्त पडलेले व कपाट उघडे असल्याचे त्यांना दिसून आले. घरातील कपाटात ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख ५० ते ६० हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. या चोरीची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी भेटी देऊन माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूअसल्याचे सांगण्यात आले.चौकटआणखी दोन घरे फोडलीअयोध्यानगर परिसरातील ओमशक्ती हौसिंग सोसायटीत वास्तव्यास असणारे दादा अब्बू मापारी हे शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी मापारी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख २० हजार रुपये लांबविले. या सोसायटीलगत असलेल्या शांतीनिकेतन सोसायटीत सतीश वाघदरी यांच्याकडे नवीन किरायाने आलेल्या एका भाडेकरूचे घरही चोरट्यांनी साफ केले आहे. भाडेकरूगावी गेले असल्यामुळे त्यांच्या घरातून किती ऐवज चोरी गेला हे समजू शकले नाही.

चोरट्यांनी बंद घरावर मारला डल्लाबजाजनगरातील चोरी झालेल्या तिन्ही ठिकाणचे नागरिक बाहेरगावी गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी या घरांवर डल्ला मारून चोरी केल्याचे समोर आले आहे. चोºयांच्या घटनांत वाढ झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWalujवाळूज