शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीनंतर खराब हवामानामुळे फळबागांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 20:21 IST

हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने बळीराजा अडचणीत

ठळक मुद्देएकूण पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) - ६९११३०फळबागांचे  क्षेत्र (हेक्टरमध्ये) -३६०००

पाचोड : जिल्ह्यातील विविध भागांत मोसंबीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात प्रामुख्याने पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरात मोसंबीच्या बागा सर्वाधिक असून शेतकरी यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खराब हवामानाचा फटका या फळबागांना बसत असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. यंदासुद्धा अतिवृष्टीने  शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सध्या थंडीचे दिवस असेल तर ढगाळ वातावरणाचा फटका मोसंबीच्या बागांना बसत आहे. 

औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडशी परिसरातील अनेक गावांचा संबंध येतो. या भागातील बोटावर मोजण्याइतके शेतकरीशेतीव्यवसाय करतात. उर्वरित बहुतांश जण फळबागांच्या माध्यमातून सर्वाधिक मोसंबीचे पीक घेत असल्याचे चित्र आहे. पाचोडची मोसंबी सातासमुद्रापार गेलेली असल्यामुळे पाचोडला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून हवामानातील बदलाचा मोसंबी पिकास मोठा फटका बसत आहे. ऐन बहरात असल्याने कधी अतिवृष्टी तर कधी वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक वाया जात असल्याची परिस्थिती आहे. 

मोसंबीसाठी सध्याचे वातावरण पोषक असते. काही प्रमाणात बागा बहरल्या आहेत. या दिवसांत पाचोडसह परिसरात आंबा बहर लागत असल्याने मोसंबीला चांगला भाव मिळताे; पण दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या मोसंबीला आंबा बहर फुटण्याची वेळ आहे. मात्र, विविध भागात ढगाळ वातावरण असल्याने आंबा बहरमधील मोसंबीचे पीक धोक्यात आले आहे. 

हिवाळ्यातील थंडी ही मोसंबी पिकासाठी अंत्यत पोषक असते. थंडीत चांगली मोसंबी येते; पण सध्या ढगाळ वातावरणामुळे  आंबा बहर गळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे सर्वत्र वापसाच नाही, त्यात ढगाळ वातावरणाचा फटका आंबा बहर मोसंबी पिकाला यावर्षी बसण्याची शक्यता आहे. - शिवाजी भुमरे, शेतकरी

माझ्याकडे साडेतीन एकर शेतीत सातशे मोसंबीचे  झाड असून गेल्या वर्षी सात लाखांचे उत्पन्न हाेते. सध्या शेतात मृग बहरची मोसंबी असून झाडाला चांगल्या प्रकारे पीक दिसत असले तरी ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे. मोसंबीला कमी खर्च येत असून उत्पन्न खऱ्यापैकी येत असल्याने नगदी पीक म्हणून मोसंबीची ओळख आहे.  पाचोडला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील मोसंबीने सातासमुद्रापार आपली ओळख निर्माण केलेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी पीक वाया जात आहे. - सुभाष डोईफोडे, शेतकरी वडजी 

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामानagricultureशेती