शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीचा मोह टाळा, न्यू इयर घरीच साजरे करा; औरंगाबादमध्ये ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 17:36 IST

Omicron Variant : ओमायक्रॉनचे नवीन संकट आणि कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे

औरंगाबाद : शहरात 31 डिसेंबरच्या ( New Year ) पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने संपूर्ण जिल्हाभरात तर औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यावतीने औरंगाबाद शहरात विविध निर्बंध आणि नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ( Omicron Variant ) शहरात नवीन वर्षाचे स्वागत करताना 31 डिसेंबर रोजी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

ओमायक्रॉनचे नवीन संकट आणि कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या शहरात दररोज २ हजार कोरोना टेस्ट होत आहेत. तसेच कोरोना लस आता घरोघरी जाऊन देण्याचे नियोजन महापालिका करत आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा तसेच शहर प्रशासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. 

गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच मोक्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी 31 डिसेंबरचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांवर अनेक बंधन असणार आहेत. मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत हॉटेल्समध्ये जेवण करणे किंवा कमी लोकांमध्ये फिरणे यावर बंधने नाहीत. 

असे असतील नियम : - कुठल्याही हॉटेलमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित उत्सव साजरा करण्यावर की बंधन घालण्यात आले आहे.- रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये 50 टक्के क्षमतेचे बंधन घालण्यात आले आहे- ड्रंक अँड ड्राइव्हवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.- रात्री उशिरापर्यंत डीजे लावून जल्लोष करणे यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.- रस्त्याने फिरताना पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरीत्या फिरता येणार नाही - मास्क आणि सॅनिटायझर चा कटाक्षाने वापर करावा लागणार आहे - विना मास्क आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाणार आहे - सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्याही पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या व्यक्तींवर  पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNew Yearनववर्षPoliceपोलिसOmicron Variantओमायक्रॉन