शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हळहळ! गर्भवतीस १५ दिवसांनी बोलावलं, रस्त्यात प्रसूती होऊन दगावलेल्या बाळाचे शवविच्छेदन

By संतोष हिरेमठ | Updated: March 22, 2023 12:31 IST

दुसऱ्या दिवशीही नातेवाइकांचा संताप; ‘ड्यूटी’वरील प्रत्येकाची चौकशी, दोन दिवसांत येणार चौकशी अहवाल

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयातून परत पाठविल्यानंतर घरी जाताना गरोदर मातेची रस्त्यातच प्रसूती होऊन मृत्यू पावलेल्या बाळाचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती आगामी दोन दिवसांत अहवाल देईल. कर्तव्यावर असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी सांगितले.

प्रसूतीला अजून १५ दिवस वेळ आहे, असे म्हणून चिकलठाणा परिसरातील रहिवासी सुनीता नाडे यांना सोमवारी जिल्हा रुग्णालयातून परत पाठविण्यात आले. मात्र, घरी जाताना वाटेतच प्रसूती होऊन नवजात शिशू दगावले. या घटनेनंतर सोमवारी सायंकाळी नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली. याप्रकरणी चौकशी समिती नेमल्याचे सांगितल्यानंतर सर्व जण माघारी फिरले. मात्र, जिल्हा रुग्णालयात मंगळवारीदेखील नातेवाईक, चिकलठाणा परिसरातील नागरिक दाखल झाले आणि कारवाईसंदर्भात विचारणा केली. त्यामुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होते.

गरज पडली तर रिक्षाचालकाचाही जबाबयाप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. कमलाकर मुदखेडकर, डाॅ. बालरोगतज्ज्ञ डाॅ. भारती नागरे आणि न्यायवैद्यकशास्त्रतज्ज्ञ डाॅ. गोरख सुरमवाड यांची समिती नेमण्यात आली आहे. सुनीता नाडे या रुग्णालयात ज्या वेळी आल्या, त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येणार आहे. गरज पडली तर रस्त्यावर प्रसूती झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणणाऱ्या रिक्षाचालकाचाही जबाब घेतला जाणार आहे. या चौकशीचा अहवाल काय येतो, कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवघ्या काही तासांच्या शिशूचे शवचिच्छेदनवयस्क व्यक्तींचे शवविच्छेदन हे नेहमीच होते. परंतु केवळ काही तासांच्या शिशूचे शवविच्छेदन होणे, हे अनेकांसाठी हळहळ व्यक्त करणारे ठरले. अनेक प्रकरणात लहान बाळांचे शवविच्छेदन होत असल्याचे घाटीतील न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कैलास झिने यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूpregnant womanगर्भवती महिला