शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘संत एकनाथ’च्या अध्यक्षांचे अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:50 IST

तातडीच्या बैठकीत निर्णय : संचालक मंडळातील मतभेद टोकाला

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सचिन घायाळ शुगर कंपनीस देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयामुळे संत एकनाथच्या संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले असून गुरुवारी बोलावलेल्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीलामाजी आमदार संजय वाघचौरे यांच्या गटाचे सहा संचालक सोडता उर्वरित संचालक गैरहजर राहिले. दरम्यान, कोरमअभावी रद्द झालेली आजची सभा पुन्हा अर्धा तासाच्या अवधीनंतर कारखाना उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेऊन न्यायालयीन व प्रशासकीय कामकाजासाठी दिलेले सह्यांचे अधिकार चेअरमन तुषार शिसोदे यांच्या कडुन काढून ते माजी आमदार तथा संचालक संजय वाघचौरे यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दुसरीकडे विद्यमान अध्यक्षांनी आजची सभा कोरमअभावी रद्द झाली असून नंतर घेतलेली सभा अवैध असल्याचे सांगितले.२८ जुलै रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आलेला वादग्रस्त ठरावरद्द करण्यासाठी गुरुवारी संचालक मंडळाची तातडीची सभा बोलावण्यात आली होती.या सभेसाठी वाघचौरे गटाचे सहा संचालक यात संजय वाघचौरे, व्हाईस चेअरमन भास्कर राऊत, विजय गोरे, अण्णासाहेब कोल्हे, गोपीकिसन गोर्डे, शिवाजीराव घोडके उपस्थित होते. सभेसाठी आवश्यक असलेली कोरमपूर्ती न झाल्याने सभा रद्द करण्यात आली. रद्द झालेली सभा पुन्हा घेण्याची मागणी संचालक विजय गोरे यांनी केली व अर्धा तासाने व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा घेऊन २८ जुलैच्या सभेतील ठराव क्रमांक २ ज्या ठरावानुसार न्यायालयीन अपील, मंत्रालयातील तडजोडी करण्यासाठी चेअरमन तुषार शिसोदे यांना अधिकार दिले आहेत, तो ठराव रद्द करून हे अधिकार संचालक संजय वाघचौरे यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.कार्यकारी संचालक ‘नॉट रिचेबल’आजची तातडीची सभा झाल्यानंतर कार्यकारी संचालक एम. बी. गोर्डे हे तातडीने ‘नॉट रिचेबल’ झाले. आजच्या सभेचे इतिवृत्त घेण्यासाठी संचालक त्यांचा शोध घेत होते, मात्र ते काही उपलब्ध झाले नाही.तातडीची सभा अवैध -अध्यक्षकोरमअभावी रद्द झालेली सभा पुन्हा घेण्याची तरतूद कारखाना उपविधीमध्ये नाही. त्यामुळे रद्द झालेली सभा पुन्हा त्याच दिवशी घेता येत नाही. आज झालेली सभा अवैध आहे. यामुळे या सभेत घेण्यात आलेले ठरावसुद्धा बेकायदेशीर असल्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी सांगितले.अध्यक्षांनी विश्वासघात केला -संजय वाघचौरेसंचालक मंडळास विश्वासात न घेता चेअरमन तुषार शिसोदे यांनी केलेल्या तडजोडी संशयास्पद व कारखान्याच्या हितास बाधा पोहचविणाऱ्या असल्याने ११ संचालकांच्या सह्या घेऊन आम्ही तातडीची सभा बोलावली होती. परंतु दबावाखाली काही संचालक हजर राहिले नाही. यामुळे कोरमअभावी रद्द झालेली सभा नियमानुसार पुन्हा अर्धा तासाने घेऊन कारखान्याच्या सभासदाचे, कामगारांचे हितरक्षण केले, असे संजय वाघचौरे यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण