शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग, व्यवसायासह नागरी वसाहतींसाठी ऑरिक उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:15 IST

ऑरिक हे औद्योगिक शहर शेंद्रा आणि बिडकीन अशा दोन टप्प्यात पूर्ण होत आहे.

ठळक मुद्देसुविधायुक्त औद्योगिक शहर  बिझनेस मार्के टिंगच्या प्रमुखांचा दावा

औरंगाबाद : दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरिडॉर या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील एक महत्त्वाचा आणि अत्याधुनिक टप्पा म्हणजे शेंद्रा-बिडकीन दरम्यान विकसित होत असलेले आॅरिक हे औद्योगिक शहर आहे. उद्योगांसाठी आवश्यक रस्ते, पाणी, वीज, संपर्क , इंटरनेट आदी सुविधा येथे उपलब्ध करण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग प्रकल्प येथे येत आहेत. तर काही प्रकल्प सुरूही झाले आहेत. १० हजार एकरातील या शहराच्या पहिल्या टप्प्यात तीन लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याचा  दावा ‘ऑरिक’ च्या बिझनेस आणि मार्केटिंगच्या प्रमुख स्मिता एक्के यांनी केला. मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरद्वारे (मासिआ) आयोजित चारदिवसीय ‘अ‍ॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो’ या औद्योगिक प्रदर्शनामध्ये ‘आॅरिक - द फ्युचर आॅफ मराठवाडा’ या विषयावर एक्के यांंनी मत व्यक्त केले. 

ऑरिक हे औद्योगिक शहर शेंद्रा आणि बिडकीन अशा दोन टप्प्यात पूर्ण होत आहे. त्या औद्योगिक शहरात विमानसेवा, रस्ते, रेल्वे हे तिन्ही दळणवळणाची साधने येथील उद्योगांना देश आणि जगाशी जोडेल. जालन्यातील ड्रायपोर्टमुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी आॅरिक  जोडले गेलेले आहे. त्यामुळे येथून निर्यातीसाठी संधी असेल. येथे उद्योग उभारणीसाठी एक खिडकी योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली जात असून, एकदा उद्योग उभारणी निश्चित झाली की त्यासाठी आवश्यक सुविधा येथे तात्काळ उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.

नवीन उद्योजक घडविण्याचा मासिआचा संकल्पमासिआने आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विविध संस्थांतील पन्नास विद्यार्थी निवडून त्यांना उद्योग उभारणीसाठी अगदी प्राथमिक पायरीपासून ते उद्योग सुरू करून बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प मासिआने हाती घेतला आहे. नवतरुण, प्रशिक्षित तरुण उद्योजकांची पहिली फळी २०२३ मध्ये बाहेर पडेल, असा दावा मासिआचे सचिव अर्जुन गायकवाड यांनी केला. ‘स्किल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इंडस्ट्री अकॅडेमिया’ या विषयावर आयोजित परिसंवादात गायकवाड यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. 

४० टक्के जागा नागरी वसाहतींसाठी आॅरिक स्वतंत्र औद्योगिक शहर असून, येथे ६० टक्के जागा उद्योगांसाठी तर ४० टक्के  जागा नागरी वसाहतींसाठी आहे. येथे प्रशस्त रस्ते, चोवीस तास पाणी आणि वीजपुरवठा, भूमिगत ड्रेनेज आदी सारे काही आहे. येथील पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाने ७ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा एक्के यांनी केला. येथे संपूर्ण शहराचे नियंत्रण करणारा अत्याधुनिक असा कमांड कंट्रोल हॉल उभारण्यात आलेला असून, यातून त्या शहराचे संपूर्ण नियंत्रण केले जाणार आहे.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय