शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

औरंगपुरा पोलीस चौकीजवळ जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:32 IST

या अड्ड्यावर १४ मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

औरंगाबाद : औरंगपुरा पोलीस चौकीपासून काही अंतरावर राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी दुपारी छापा मारून गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. या अड्ड्यावर १४ मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला.

त्यात खेळण्यासाठी लागणारे ५४ हजार रुपयांचे क्वाईन, ४० हजारांची रोकड, असा दीड लाख रुपयांचा ऐवज, जुगाराचे साहित्य गुन्हे शाखेने जप्त केले. सीसीटीव्ही तपासणी सुरू असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. विष्णू तनवाणी, चंदन शांतीलाल पहाडिया (चंदू पहिलवान), बाळू आनंदराव जाधव, राहुल गोविंदराव धुळे, बंडू बाबूराव भरते, कृष्णा पांडुरंग दळवी, राजू रमेश खरात, धम्मरत्न सुदामराव इंगळे, राजेंद्र काशीनाथ मरमट, रंगनाथ नामदेव नरोडे, बाबूखाँ इसाखाँ, सुभाष एकनाथ वाघ, नजीमोद्दीन मोहंमद अब्दुल, रामचंद्र ठामसिंग राजपूत, अशी जुगाऱ्यांची नावे आहेत. यातील नजीमोद्दीन हा गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

या अड्ड्यावर २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासताना २ कॅमेऱ्यांची जोडणी नसल्याचे समोर आल्यावर शंका बळावली. त्यानंतर आणखी तपासणी केल्यावर त्या दोन कॅमेऱ्यांचा डीव्हीआर वेगळा ठेवण्यात आल्याचे समोर आले. त्या डीव्हीआरमधील फुटेज तपासल्यावर चंदू पहिलवान पैशांवर जुगार खेळताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले. कायदेशीर बाबी तपासून या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PoliceपोलिसraidधाडArrestअटक