शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कोजागरीच्या ‘सेलिब्रेशन’ची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:47 IST

दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.

औरंगाबाद : दसरा झाल्यानंतर वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून, कोजागरीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गाण्यांच्या मैफली आयोजित करून आपल्या आप्तस्वकीयांसह रात्री जागरण करून सुकामेवा घालून आटविण्यात आलेले दूध प्राशन करण्याचीही अनेक ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.

दूध महासंघ आणि परराज्यातून  येणारे दूध मिळून शहरात दररोज दोन ते सव्वादोन लाख लिटर दुधाची विक्री होते, कोजागरीनिमित्त तीन लाख लिटर दूध येणार असल्याचे सांगण्यात आले. दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक पी. बी. पाटील म्हणाले की, दररोज दूध महासंघातर्फे  शहरात पन्नास हजार लिटर दूध पुरविले  जाते. मागच्या वर्षी कोजागरीच्या दिवशी तीस हजार लिटर जास्तीचे दूध मागवले गेले होते. यावर्षी चाळीस हजार लिटर अतिरिक्त दूध येणार आहे.

दर महिन्यात सुकामेव्याच्या होणाऱ्या विक्रीपेक्षा कोजागरीनिमित्त होणारी विक्री ५० टक्क्यांनी अधिक असते; परंतु यंदा त्यावर दुष्काळाची छाया आहे, असे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले. चारोळी, काजू, बदाम, के शर, पिस्ता या सुकामेव्याला यानिमित्त जास्त मागणी असते. मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथील चारोळी, गोवा आणि दक्षिण भारतातून आलेले काजू, अमेरिकेहून आलेले बदाम, क ाश्मीरहून आलेले के शर आणि इराण-अमेरिकेवरून आलेले पिस्ते औरंगाबादकरांचे दूध आणखी स्वादिष्ट करणार आहेत. 

दुष्काळाचा परिणामदरवर्षीपेक्षा यावर्षी १०-२० टक्क्यांनी सुकामेव्याची मागणी घटली. हा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम असल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले.अश्विनी पौर्णिमेला लक्ष्मी देवी घराघरामध्ये फिरून ‘को-जागरी’ असे म्हणत कोण जागरण करीत आहे, हे पाहत असते. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘कोजागरी’ म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्ती जागरण करतात, त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते, अशी दंतकथा याविषयी सांगितली जाते. 

खगोलीय दृष्टिकोनातून कोजागरीचे महत्त्व२७ नक्षत्रांपैकी सर्वात पहिले नक्षत्र म्हणजे अश्विनी. तसेच अश्विनी पौर्णिमेनंतर हिवाळा सुरू होतो. दिवसा तापमान कमी आणि रात्री जरासे उबदार वातावरण या दिवसांत जाणवते. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येऊन मोठा दिसतो. त्यामुळे सर्वत्र टिपूर चांदणे आणि चंद्राचा दुधाळ प्रकाश पडलेला असतो. हा क्षण साजरा करण्यासाठी कोजागरीची सुरुवात झाली असावी, असे शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkojagariकोजागिरीmilkदूध