शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

औरंगाबादचे नितीन घोरपडे २४ तास स्टेडियम स्पर्धेत चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:15 AM

औरंगाबाद येथील धावपटू नितीन घोरपडे यांनी मुंबई विद्यापीठ येथे नुकत्याच झालेल्या २४ तास स्टेडियम स्पर्धेत विशेष ठसा उमटवला. दमट हवामान, जोरदार पाऊस व घामटा काढणारे वातावरण या प्रतिकूल परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाताना नितीन घोरपडे यांनी या स्पर्धेत ४00 मीटर ट्रॅकवर ११५.६ कि. मी. अंतर धावताना २८९ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील धावपटू नितीन घोरपडे यांनी मुंबई विद्यापीठ येथे नुकत्याच झालेल्या २४ तास स्टेडियम स्पर्धेत विशेष ठसा उमटवला. दमट हवामान, जोरदार पाऊस व घामटा काढणारे वातावरण या प्रतिकूल परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाताना नितीन घोरपडे यांनी या स्पर्धेत ४00 मीटर ट्रॅकवर ११५.६ कि. मी. अंतर धावताना २८९ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.औरंगाबादच्या महिला धावपटू माधुरी निमजे यांनीदेखील या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यांनी ६६ कि.मी. अंतर व १६५ फेºया तसेच अजित घुले यांनी ७६.४ कि.मी. व १९१ फेºया एवढे अंतर यशस्वीपणे पूर्ण करून १२ तासांची ही स्पर्धा पूर्ण केली.नितीन घोरपडे हे चांगले सायकलपटूदेखील आहेत. त्यांनी याआधी २00, ३00, ४00 आणि ६00 कि.मी. सायकल चालवली आहे. त्याचप्रमाणे धावपटू म्हणून त्यांनी १५.३९ तास १00 कि. मी. सलग धावणे, ३२ तास २९ मिनिटे वेळेत भर उन्हाळ्यात नाशिक ते ठाणे येथील १६१ कि. मी. अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीपासून ११८00 मीटर उंच असणाºया खांर्दुंगला येथे ७२ कि. मी. धावणे तसेच लडाख अल्ट्रा मॅरेथॉनही यशस्वीपणे पूर्ण केली आहे. नितीन घोरपडे यांनी चेन्नई ट्रायथलॉनही गाजवली आहे. या स्पर्धेत त्यांनी ३.९ कि.मी. जलतरण, १८0 कि.मी. सायकलिंग आणि ४२ कि. मी. धावणे हे तिन्ही क्रीडा प्रकार १८ तास आणि ८ मिनिटांत पूर्ण केले आहे. तसेच २१ कि. मी.च्या २९ अर्धमॅरेथॉन, ४२ कि.मी.च्या ५ पूर्ण मॅरेथॉन, ५0 कि. मी.च्या ३ अल्ट्रा मॅरेथॉन व ७५ कि.मी.च्या २ अल्ट्रा मॅरेथॉनही यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यांनी योग शिक्षकाचा डिप्लोमाही उत्तीर्ण केला आहे.