शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

'औरंगाबादची जागा शिवसेनेचीच, तयारीला लागा'; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकारी, नेत्यांना संदेश

By बापू सोळुंके | Updated: April 15, 2024 11:34 IST

मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री विमानतळावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेची आहे. निवडणुकीची तयारी करा, कार्यकर्त्यांचे मेळावे घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री चिकलठाणा विमानतळावर पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले.

बुलढाणा येथील प्रचारसभा आटोपून मुख्यमंत्री मुंबईला जाण्यासाठी रविवारी रात्री ११.४५ वाजता चिकलठाणा विमानतळावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आ. संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवासेनेचे ऋषिकेश जैस्वाल, नीलेश शिंदे आणि विनोद पाटील उपस्थित होते. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आणि त्यांच्या सोबत छायाचित्रेही काढू दिली. पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा जयघोष केला. नंतर ते विमानतळाच्या आत गेले. 

तेथे त्यांनी आ. शिरसाट, जंजाळ आणि अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना औरंगाबादची जागा शिवसेनेचीच आहे. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, दोन दिवसांत जागावाटप होईल, असे स्पष्टपणे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे औरंगाबाद लोकसभेची निवडणूक शिंदेसेनाच लढणार असल्याचे आता अंतिम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आ. शिरसाट, जंजाळ आणि लोकसभेसाठी शिंदेसेनेकडून इच्छुक उमेदवार विनोद पाटील यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबाबतची माहिती समजू शकली नाही. सुमारे अर्धा तास मुख्यमंत्री विमानतळावर होते. नंतर ते चार्टर्ड विमानाने मुंबईला रवाना झाले.

विनोद पाटील यांना विमानतळावर बोलावलेविनोद पाटील यांचा रविवारी वाढदिवस असल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना चिकलठाणा विमानतळावर बोलावून घेतले हाेते. मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळावर येण्यापूर्वीच पाटील हे तेथे हजर होते. मुख्यमंत्र्यांनी विनोद पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या जेवणाचा डबाही पाटील यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४