शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची कनेक्टिव्हिटी वाढणार; इंडिगोचे १६ डिसेंबरपासून बंगळुरूसाठी उड्डाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:04 IST

शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते

ठळक मुद्देआठवड्यातून ४ दिवस सेवा असणारहैदराबादपाठोपाठ दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी

औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर १६ डिसेंबरपासून इंडिगोकडून  बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. आठवड्यातून ४ दिवस हे विमाम उड्डाण घेईल. 

आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते; परंतु कोरोनामुळे विमानसेवा ठप्प झाली होती. कोरोनाच्या विळखा कमी झाल्यानंतर औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.  गेली काही दिवस बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराला हैदराबादपाठोपाठ दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षा होती. अखेर ही कनेक्टिव्हिटी लवकरच मिळणार आहे.

उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, अनेक दिवसांपासून या विमानसेवेसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर १६ डिसेंबरपासून इंडिगो ही सेवा सुरू करीत आहे. कोरोना विळख्यानंतर औरंगाबादेतील विमानसेवा पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू झाल्यानंतर विमानसेवा वाढीस आणखी मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू होण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. 

आठवड्यातून ४ दिवस सेवाआठवड्यातून रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हे विमान उड्डाण घेईल. बंगळुरूहून हे विमान सकाळी ७.४० वाजता उड्डाण घेईल आणि औरंगाबादेत सकाळी ९.१५ वाजता दाखल होईल. त्यानंतर औरंगाबादहून सकाळी ९.४५ वाजता उड्डाण घेईल आणि सकाळी ११.२० वाजता हे विमान बंगळुरू येथे पोहोचेल.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादBengaluruबेंगळूर