लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवसभर गर्मीने हैराण झालेल्या शहरवासियांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने ‘कूल कूल’ करुन टाकले. सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दिवसभर उन्हाचा पारा हैराण करणारा होता; परंतु सर्वांना दिलासा देत पावसाने रात्री सव्वादहा वाजता जोरदार हजेरी लावली.रात्री १०.१५ वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धातास जोराचा पाऊस पडल्याने वातावरणात एक प्रकारचा आल्हादमय थंडावा पसरला. त्यामुळे दिवसभराच्या उकाड्यानंतर औरंगाबादच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडला. सायंकाळपासूनच आकाशात ढग जमण्यास सुरुवात झाली होती. ढगाळ वातावरणामुळे गरमीचा अधिक परिणाम जाणवत होता. त्यामुळे आज रात्री पाऊस होणार असा अंदाज वर्तविला जाऊ लागला.अखेर हा अंदाज ठरला आणि रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री ढगांचा सौम्य गडगडाटही ऐकायला मिळाला. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतही औरंगाबादमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट नव्हता. औरंगाबाद जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी ३६३.०८ मि.मी. पाऊस झालेला आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला चांगली हजेरी लावल्यानंतर सुमारे ५० दिवस पावसाने ओढ दिलीहोती. त्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या शेवटी काही दिवस चांगला पाऊस झाला. मात्र, अद्यापही शहरातमोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दिवसभराच्या उकाड्यानंतर औरंगाबादकरांची रात्र ‘कूल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:50 IST