शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

औरंगाबादकरांना स्मार्ट सिटी बसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:24 AM

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराची जीवनवाहिनी असते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून हालचाल सुरू आहे; परंतु पाच, दहा बस देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीचा विचार करून चांगल्या आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक वाहतुकीचे जाळे पसरावे शहरभर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराची जीवनवाहिनी असते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून हालचाल सुरू आहे; परंतु पाच, दहा बस देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तर सध्याच्या परिस्थितीचा विचार करून चांगल्या आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे.

एसटी महामंडळाच्या कारभारामुळे काही वर्षांपासून शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढेपाळली आहे. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून एकप्रकारे शहर बससेवा आपल्या खांद्यावरून महानगरपालिकेच्या खांद्यावर सोपविण्याचे प्रयत्न एसटी महामंडळाकडून वेळोवेळी झाले; परंतु या नुकसानीला कोणत्या बाबी कारणीभूत आहेत, याचा विचारच केला गेला नाही. त्यामुळे शहरातील केवळ १३ मार्गांवर अवघ्या ३१ शहर बसेस धावत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पाच बस खरेदी करून त्या चालविण्यासाठी महामंडळाला देण्यात येणार आहेत.

जानेवारी २०१८ पासून या पाच बस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या पाच बसेस सुरू करताना पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. ही व्यवस्था चांगली असेल तर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणाचा ताण कमी होईल. शहरात अधिकाधिक लोकांना कमीत कमी वेळात पाहिजे त्याठिकाणी किफायतशीर दरात जाता यावे, हाच मुख्य उद्देश ठेवून नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे जाळे शहरभर पसरविले पाहिजे.

स्मार्ट सिटीच्या प्रवासात आता शहर बससेवेचा विचार होत आहे. त्यामुळे किमान पुढील काही महिन्यांत औरंगाबादेत सक्षम शहर बसचे दर्शन औरंगाबादकरांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रस्त्यांवर रिक्षांचे साम्राज्य, त्यांची मनमानी थांबविण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. शहर बसला प्रतिसाद असतानाही एसटी महामंडळ नेहमीच जबाबदारी झटकत होते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. परंतु यापुढे शहरात प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस देणे आवश्यक आहे. चिकलठाणा, मुकुं दवाडी भागातून विद्यापीठात जाणाºया विद्यार्थ्यांना औरंगपुºयापर्यंत बसने आणि त्यानंतर तेथून विद्यापीठाचा प्रवास रिक्षाने करावा लागतो. अशीच स्थिती इतर भागांची आहे. ती अवस्था दूर व्हावी, अशी सर्वसामान्य प्रवाशांची अपेक्षा आहे. चिकलठाणा ते वाळूज मार्गावर किमान दर २० मिनिटाला शहर बस उपलब्ध झाली पाहिजे. शिवाजीनगर, शहानूरमियाँ दर्गा चौक, सिल्लेखाना चौक, समर्थनगर, सातारा, देवळाईसह शहरातील विविध भागांत ठराविक वेळेत शहर बसची सुविधा मिळाली पाहिजे.

अत्यावश्यक मार्गांवर सेवासध्या चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे आजघडीला अत्यावश्यक मार्गांवर शहर बस चालविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे.-संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

सर्वसामान्यांना सुविधाशहरातील रस्त्यांनुसार कोणत्या भागात कोणत्या आकाराची बस अधिक चांगली राहील, याचे नियोजन केले जात आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून शहर बससेवा देण्यास प्राधान्य दिले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे अन्य वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राहील, असे नियोजन केले जात आहे.-नवल किशोर राम, जिल्हाधिकारी