शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनमानी राज; वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश झुगारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:51 IST

चालू आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाला ग्रहण लागले आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत तीन-चार अधिकारी आले आणि गेले

औरंगाबाद : मार्च एण्ड अवघ्या ४५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्चाविना पडून आहे. दलित सुधार योजनेच्या ४२ प्रस्तावांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी महिनाभरापूर्वीच एकत्रित प्रशासकीय मान्यता दिली; पण प्रभारी समाजकल्याण अधिकारी आणि पदाधिकार्‍यांना एकत्रित प्रशासकीय मान्यता मान्य नाही. नवीन ५७२ प्रस्ताव छाननीमध्ये उतरले; पण त्यास अद्यापही मान्यता देण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेत सध्या सर्वच विभागांमध्ये मनमानी राज सुरू असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात निधी खर्च होईलच, असे कोणीही ठामपणे सांगायला तयार नाही.

चालू आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाला ग्रहण लागले आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत तीन-चार अधिकारी आले आणि गेले. सध्या खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. मात्र, ते या कार्यालयात कधी बसलेच नाहीत. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच सभापती धनराज बेडवाल, अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड या सदस्यांनी मोकाटे यांच्याकडील समाजकल्याण अधिकार्‍यांचा कार्यभार काढून तो दुसर्‍या अधिकार्‍यांकडे सोपविण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याकडे केली. अद्याप कोणाकडेही पदभार सोपविण्यात आलेला नाही. कार्यालयात प्रभारी अधिकारी बसायलाच तयार नसल्यामुळे या विभागाच्या अनेक योजना रखडल्या आहेत.

गेल्या वर्षात मंजूर झालेल्या २४१ प्रस्तावांपैकी ४२ प्रस्ताव असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे ते प्रस्ताव बाजूला ठेवून उर्वरित प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांची मसुरीला प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यामुळे ते महिनाभराच्या सुटीवर होते. त्या काळात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी या ४२ प्रस्तावांना एकत्रित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. असे असताना वैयक्तिक प्रशासकीय मान्यतेचा आग्रह समाजकल्याण अधिकार्‍यांबरोबर पदाधिकारी- सदस्यांनी धरला आहे.

तोंडी नको, लेखी आदेश द्यासमाजकल्याण विभागात सध्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पदाधिकारी- सदस्य आणि अधिकार्‍यांनी प्रस्तावनिहाय वैयक्तिक मान्यतेबद्दल कर्मचार्‍यांना धारेवर धरले आहे. मात्र, कर्मचार्‍यांनी यासंदर्भात तोंडी नको, लेखी आदेश द्या, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे काही सदस्यांनी कर्मचार्‍यांवर आर्थिक व्यवहाराचे आरोप केल्यामुळे समाजकल्याण विभागात वातावरण तापले आहे. यासंदर्भात आता कर्मचारी स्वत:च ‘सीईओ’ व विभागीय आयुक्तांकडे तक्रारीच्या तथ्य शोधनासाठी चौकशीची मागणी करणार आहेत. हतबल कर्मचार्‍यांनी दीर्घ रजेवर जाण्याचाही निर्णय घेतला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद