शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सदस्यांना विश्वासात घेऊनच होणार ५० कोटींचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:35 IST

आमदार- खासदार नव्हे, तर सर्व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊनच रस्ते मजबुतीकरणासाठी मिळालेल्या (३०५६ व ५०५४ लेखाशीर्ष) ५० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करणार

औरंगाबाद : आमदार- खासदार नव्हे, तर सर्व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊनच रस्ते मजबुतीकरणासाठी मिळालेल्या (३०५६ व ५०५४ लेखाशीर्ष) ५० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करणार असल्याची ग्वाही जि. प. बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते (३०५४ लेखाशीर्ष) व इतर जिल्हा मार्ग (५०५४ लेखाशीर्ष) मजबुतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाला आहे. मार्चअखेर या दोन्ही लेखाशीर्षखाली सुमारे १४ कोटी रुपये व चालू आर्थिक वर्षात जवळपास ३५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. दरम्यान, या निधीतून जिल्ह्यातील काही आमदार- खासदारांनी रस्त्यांच्या कामांसाठी शिफारशी केल्या आहेत. त्यास जि. प. सदस्यांनी कडाडून विरोध केला आहे. 

या पार्श्वभूमीवर प्राप्त निधीतून घेण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन रखडले आहे. यासंदर्भात बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, रस्ते मजबुतीकरणाच्या कामांचे नियोजन करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेचा आहे. पालकमंत्र्यांनीही त्यानुसार जिल्हा परिषदेला निधी दिला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन येत्या २५ सप्टेंबरपर्यंत प्राप्त निधीतून कामांचे नियोजन केले जाईल. त्यानंतर महिनाभरात निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल व साधारणपणे आॅक्टोबरअखेरपर्यंत कार्यारंभ आदेश निर्गमित केले जातील. 

आमदार- खासदारांनी केलेल्या शिफारशीबाबत ते म्हणाले, यापूर्वी आमदार- खासदारांनी केलेल्या शिफारशींची कामे जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. असे असले तरी त्या- त्या सर्कलमधील सदस्यांना विश्वासात घेऊन आमदार- खासदारांनी शिफारस केली व त्यास सदस्यांची संमती असेल, अशाच त्यांच्या कामांचे नियोजन केले जाईल. आचारसंहितेपूर्वी रस्त्यांची कामे मार्गी लागली पाहिजेत, या दृष्टिकोनातून नियोजन केले जाईल. यापूर्वी भाजपचे ६ सदस्य वंचित राहिले होते. त्यांना प्रत्येकी १५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यांनाही यावेळी रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला जाईल. जिल्हा नियोजन समितीकडून मोठा निधी मिळालेला असल्यामुळे केलेल्या कामांचे नियोजन करून पालकमंत्र्यांना सादर केले जाईल.

गटनेत्यांच्या पत्रावर घेणार शिफारसजिल्हा परिषदेतील काँग्रेस, भाजप, शिवसेन या तीनही गटनेत्यांच्या पत्रावर यावेळी शिफारस घेणार आहोत. अभियंत्यांकडून आलेल्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. मार्चमध्ये प्राप्त झालेला निधी कमी होता. त्या निधीत सर्व ६२ सदस्यांच्या सर्कलमध्ये कामे झाली नसती. त्यामुळे मार्चमध्ये व चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीतून एकत्रित नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सदस्यांना न्याय मिळेल, असे नियोजन करून ते पालकमंत्र्यांना सादर केले जाईल. - विलास भुमरे, जि. प. बांधकाम सभापती

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी