शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीला ३ मेडल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:52 AM

रत्नागिरी येथे आज झालेल्या राष्ट्रीय शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान उदयोन्मुख अ‍ॅथलिट साक्षी चव्हाण हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जबरदस्त कामगिरी करीत तीन पदके जिंकत आपला विशेष ठसा उमटवला.

औरंगाबाद : रत्नागिरी येथे आज झालेल्या राष्ट्रीय शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान उदयोन्मुख अ‍ॅथलिट साक्षी चव्हाण हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जबरदस्त कामगिरी करीत तीन पदके जिंकत आपला विशेष ठसा उमटवला.साक्षी चव्हाण हिने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २५.८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे तिने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही जबरदस्त कामगिरी करीत रौप्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे ४ बाय १०० मीटर रिलेत तिने ४६.८ सेकंदांची वेळ नोंदवत महाराष्ट्राला कास्यपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. साक्षी चव्हाण हिने गतवर्षी नागपूर येथील राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटरला सुवर्ण आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. तसेच त्याचवर्षी तिने पुणे येथील सबज्युनिअर स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. साक्षी चव्हाण ही क्रीडा प्रबोधिनीची विद्यार्थिनी असून, गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर प्रशिक्षक सुरेंद्र मोदी आणि प्रशिक्षिका पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या जबरदस्त कामगिरीबद्दल तिचे क्रीडा उपसंचालक व क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य राजकुमार माहादावाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांनी अभिनंदन केले आहे.