शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

‘ह्योसंग’मुळे औरंगाबाद बनेल वस्त्रोद्योगाचे हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:20 IST

औरंगाबाद शहराच्या औद्योगिकीकरणाची ओळख आॅटो इंडस्ट्री. वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमुळे ही ओळख जगभर पोहोचली. आॅरिक सिटीत ‘ह्योसंग’ कंपनीमुळे आता वस्त्रोद्योगाचे हब म्हणून उद्योग आणि शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरोजगारनिर्मिती : कापडनिर्मितीच्या कंपनीमुळे लघु उद्योगांची नवी साखळी होणार तयार

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या औद्योगिकीकरणाची ओळख आॅटो इंडस्ट्री. वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमुळे ही ओळख जगभर पोहोचली. आॅरिक सिटीत ‘ह्योसंग’ कंपनीमुळे आता वस्त्रोद्योगाचे हब म्हणून उद्योग आणि शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत २२ औद्योगिक क्षेत्र आहेत. औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात जालना टप्पा-१, टप्पा-२, टप्पा-३, हे क्षेत्र आहेत. बीड जिल्ह्यात बीड, माजलगाव हे क्षेत्र येतात. या औद्योगिक वसाहतींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. वाळूज येथील वाहन आणि वाहनांचे विविध पार्ट बनविणाऱ्या कंपन्यांमुळे आॅटो हब म्हणून ओळख निर्माण झाली आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात परदेशात माल निर्यात होतो. वाहननिर्मिती करणाºया मोठ्या कंपन्यांमुळे त्यांना पूरक पार्ट बनविणाºया लघु उद्योगाची संख्याही कमालीची वाढली.दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेल्या आॅरिक सिटीत ‘ह्योसंग’ कंपनीने शेंद्रा येथे कार्यालय सुरूकेले आहे. आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीत पहिली आणि मोठी गुंतवणूक असलेल्या ह्योसंग ग्रुप ‘अँकर’ गुंतवणूकदार ठरले आहेत. शेंद्रा येथे आॅरिक सिटीत अँकर प्रकल्प म्हणून येणाºया ‘ह्योसंग’ या कोरियन कंपनीसोबत २,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. यामध्ये ‘ह्योसंग’ला प्रकल्पासाठी १०० एकर जागा दिली आहे. ‘ह्योसंग’ ही जगातील केमिकल आणि टेक्स्टाईलमधील प्रसिद्ध कंपनी आहे. आॅरिक सिटीत ही कंपनी टेक्स्टाईलमध्ये गुंतवणूक करीत आहे. कापडनिर्मिती करणाºया या कंपनीमुळे औरंगाबादेत कापड निर्मितीसंदर्भात पूरक उद्योग सुरू होण्यास वाव मिळणार आहे. या कंपनीच्या निमित्ताने आॅरिक सिटीचे आणि औरंगाबादचे चित्र बदलणार आहे.‘ह्योसंग’ कंपनीमध्ये तब्बल १ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे उद्योगांची इको सिस्टीम तयार होण्यास मदत होणार आहे. जपान आणि कोरिया या देशांतील कंपन्यांपैकी ‘ह्योसंग’ने केलेली गुंतवणूक मोठी ठरली आहे. फेब्रुवारीत १०० एकरच्या जागेसाठी आरक्षण रक्कम भरून कंपनीने भूखंड प्राप्त केला. शिवाय कंपनीच्या चमूने भूखंड आणि सोयी-सुविधांची पाहणी केली होती. कंपनीने आता शेंद्रा येथे कार्यालय सुरू केले आहे. तात्पुरत्या स्वरूपातील हे कार्यालय सुरू करून कंपनीने उद्योग उभारणीची तयारी पूर्ण झाल्याचे संकेत दिले आहेत. आॅरिक सिटीत प्लॉट क्र मांक १, सेक्टर क्रमांक ११ येथे ह्योसंग इंडिया प्रा.लि. नावाने हे कार्यालय सुरूझाले आहे. कंपनीचे प्रत्यक्षात उत्पादन सुरू होण्यास २०१९ उजाडणार आहे.पूरक उद्योग सुरू होण्यास चालना मिळणार असल्याने मराठवाड्याला ही कंपनी मार्गदर्शक ठरेल. कापडनिर्मितीमुळे मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र वाढीला लागेल आणि पर्यायाने शेतकºयांना फायदा होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. मोठ्या कंपनीला अनेक मूलभूत आणि कच्च्या साधनांची आवश्यकता असते. त्यामुळे या एका कंपनीमुळे छोट्या-छोट्या कंपन्यांची साखळी सुरू होण्यास हातभार लागेल. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे हब निर्माण होण्यास वाव मिळेल. ज्याप्रमाणे वाळूजमुळे औरंगाबाद शहराची आॅटो हब, अशी ओळख आहे. ‘ह्योसंग’ कंपनीमुळे आणखी एक नवी ओळख निर्माण होईल, अशी आशा आहे.\\\‘ह्योसंग’ कंपनीमुळे वस्त्रोद्योगाला चालना मिळेल. दीड वर्षात या कंपनीचे उत्पादन सुरू होणार आहे. या एका कंपनीमुळे इतर अनेक कंपन्या येण्यास आणि भूखंड घेण्यास इच्छुक आहेत.-सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी