शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात होणार औरंगाबाद डिजिटली ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:13 IST

‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देजागतिक इंटरनेट दिन : १४० ठिकाणांवर उपलब्ध होणार ‘वाय- फाय’

औरंगाबाद : ‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.२९ आॅक्टोबर हा दिवस सर्वत्र जागतिक इंटरनेट दिन म्हणून ओळखला जातो. स्वयंपाकघरातल्या मिठापासून ते अंतराळापर्यंत कशा संदर्भातही अडचण आलीच, तर तात्काळ मदतीला येते ते इंटरनेट. याच इंटरनेटमुळे अख्खे जग एका छोट्याशा चेंडूसमान वाटत असून, अवघ्या एका ‘क्लिक’ वर येऊन ठेपले आहेत. प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही फायदे आणि तोटे असतात त्याप्रमाणे इंटरनेटच्या तोट्यांकडे जर दुर्लक्ष केले, तर इंटरनेटद्वारे उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे तरुणाई ‘इंटरनेट भक्त’ झाली आहे.आता काळाच्या मागणीनुसार कोणतीही सिटी ‘डिजिटली स्मार्ट’ झाल्याशिवाय तिची गणना ‘स्मार्ट सिटी’मध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ‘आयटी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटलायझेशन’ अशी एक तरतूद आहे. या तरतुदीला अनुसरून औरंगाबाद शहर वर्षभरात डिजिटली स्मार्ट बनेल. या संदर्भातील टेंडर नुकतेच मान्य झाले असून कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे समजते.चौकट :डिजिटली स्मार्ट औरंगाबाद -- या योजनेअंतर्गत महानगरपालिका, कॅनॉट गार्डन, निराला बाजार, औरंगपुरा, शहरातील विविध महाविद्यालये आणि आसपासचा परिसर, संपूर्ण जालना रोड, शहरातील प्रमुख चौक, मुख्य बाजारपेठा अशा एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध क रून दिली जाणार आहे.- शहरातील ५० बस थांब्यांवर देखील ही सुविधा उपलब्ध असेल.- शहर सुरक्षित करण्यासाठी एकूण ७०० कॅमेरे बसविण्यात येतील.- या योजनेसाठी १.२ कोटींचा खर्च लागणार असून, सुरळीतपणे काम सुरू राहिले तर नऊ महिने ते एक वर्ष या काळात अशा प्रकारच्या सुविधा प्रत्यक्षात येतील, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :InternetइंटरनेटAurangabadऔरंगाबाद