शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:52 IST

महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला.

ठळक मुद्दे१२ कोटींची थकबाकी : महानगरपालिकेने ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.यासंदर्भात महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, महापालिके ला दरमहा वीज बिल भरण्यासंबंधी नोटिसा दिल्या जातात. मागील तीन महिन्यांपासून महापालिकेकडे १२ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. यासंदर्भात आपण स्वत: मनपा अधिकाºयांना वीज बिल भरण्याबाबत बोललो. त्यानंतर पत्रव्यवहार केला; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आज दुपारी जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी धावपळ करून ३ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपासून खंडित केलेला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. उर्वरित थकबाकीची रक्कम तीन-चार दिवसांत देण्याचे मनपा अधिकाºयांनी आश्वासन दिले आहे. त्यानंतरही जर थकबाकीची रक्कम दिली नाही, तर पुन्हा वीजपुरठवठा खंडित करण्यात येईल, असेही मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले.अनेक भागांत पाण्यासाठी भटकंती; उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईयंदा जायकवाडी जलाशयात मुबलक पाणी असतानादेखील शहरातील अनेक भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच शहरात दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अपुºया पाणीपुरवठ्यामुळे छावणी परिसरालगत शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा या भागांसह शहरातील अनेक भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात ४५ मिनिटे पाणी सोडले जाते.त्यातही १५ ते २० मिनिटे अगोदर पाण्याऐवजी नळाला हवाच येते. त्यानंतर अवघे २० ते २५ मिनिटेच पाणी येते तेही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागांना पाण्याच्या टाकीतून पाणी सोडले जात नाही. रेल्वेस्टेशन येथून मुख्य जलवाहिनीतून पाणी सोडले जाते. त्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणी येते. त्यामध्ये आमचा दोष नाही, असे सांगून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वेळ मारून नेत आहेत.