शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : अन् जीवाच्या भीतीमुळे अपार्टमेंट सोडून पळालो; दंगलीत सापडलेल्या कुटुंबियांची कहाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:47 IST

राजाबाजार आणि नवाबपुरा परिसरात दंगल उसळल्यानंतर तेथील अनेक कुटुंबियांनी जीवाच्या भीतीपोटी घरे सोडून नातेवाईकांकडे आसरा घेतला.

औरंगाबाद : राजाबाजार आणि नवाबपुरा परिसरात दंगल उसळल्यानंतर तेथील अनेक कुटुंबियांनी जीवाच्या भीतीपोटी घरे सोडून नातेवाईकांकडे आसरा घेतला. त्यापैकीच समद कुटुंबीय. समद कुटुंबियांनी शुक्रवारी मध्यरात्री जीवाच्या भीतीमुळे चार मजली अपार्टमेंट सोडून नातेवाईकांकडे पूर्ण परिवार हलविला. दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या मालमत्तांच्या अग्नीचे निखारे जसे धगधगत आहेत. त्याप्रमाणे अनेक कुटुंबियांच्या डोळ्यासमोरून ‘ती’ रात्र जाण्यास तयार नाही. 

राजाबाजार आणि नवाबपुरा या दोन्ही वॉर्डांच्या सीमेवर समद भावंडं एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास झालेल्या दंगलीपूर्वी ते एमजीएम हॉस्पिटलमधून घरी आले होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पुतणीवर उपचार सुरू होते. पुतणीचे निधन झाल्यामुळे दु:खात परिवार शोकसागरात बुडाला आणि इकडे परिसरातील सुरू झालेल्या दंगलीतून काही दगड त्यांच्या घरांच्या काचावर आले. दगडफेकीत अपार्टमेंटच्या काचा फुटल्या, दरवाजेही फु टले. अपार्टमेंटलगत असलेल्या घरासमोरील वाहने पेटविल्याचे त्यांच्या लक्षात आले, तसेच त्यांच्या अपार्टमेंटच्या डक्टमध्ये आग लावली. त्यामुळे अब्दुल समद, अब्दुल सलाम, अब्दुल रईस, रिझवान अहेमद यांनी तातडीने कुटुंबियांना नातेवाईकांकडे हलविण्याचा निर्णय घेतला. 

हा तर भाईचाऱ्यावर हल्ला समद यांनी सांगितले, वडिलांच्या काळापासून आमचे राजाबाजार,नवाबपुऱ्यात वास्तव्य आहे. त्यामुळे येथे भाईचाऱ्यासारखे सर्वांशी आमचे संबंध आहेत. दंगल करणाऱ्यांनी येथील भाईचाऱ्यावर हल्ला केला आहे. आमचे मित्र असलेले साईनाथ ट्रेडर्स, भारतीया हॉस्पिटलवरही त्यांनी हल्ला केला. पाणीपुरवठ्यावरून मोतीकारंजामध्ये वाद झाला मग राजाबाजार, नवाबपुऱ्यामध्ये वाद कशासाठी झाला, याचा प्रश्न आम्हाला पडला आहे. तणावपूर्ण वातावरणात रविवारी दुपारी अपार्टमेंटमधील नुकसान पाहिल्यानंतर त्या भावांचे डोळे पाणावले. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारHomeसुंदर गृहनियोजनAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस