शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : परवानगी नसतानाही शिवसेनेच्या पोलीसविरोधी मोर्चास सुरुवात ; पोलीस आयुक्तांचा इशारा डावलला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:05 IST

११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास सुरुवात झाली.

औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास पैठण गेट येथून  सुरुवात झाली. विशेष म्हणजे या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून  विनापरवानगी मोर्चा काढाल, तर गुन्हे नोंदवू आणि अटकेची कायदेशीर कारवाईही केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काल दिला होता. या इशाऱ्याला डावलून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला आहे.  

शहरातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, शिवसेना कार्यकर्ता लच्छू पहिलवान यांना अटक केली. या अटकेनंतर शिवसेनेने पोलिसांची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने आजचा मोर्चा आयोजिल केला आहे. आज सकाळपासूनच क्रांती चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते जमत होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना मोर्चा निघत असल्याने मोर्चा सुरु होण्यापूर्वी सेना पदाधिकाऱ्यांचा पोलिसांना सोबत वाद झाला.  हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटीचौक, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा जाणार आहे. 

परवानगी नाकारल्याचे दिले पत्रमोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेकडून पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. याबाबतचे पत्र पोलिसांनी शिवसेनेला कालच दिले आहे .

एसआरपीचा बंदोबस्तपोलिसांनी खबरदारी घेऊन विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले. राज्य राखीव दलाच्या सात कंपन्या, शहर पोलीस दलातील तीन उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिका-यांसह सुमारे अडीच हजार पोलीस तैनात आहेत. काही गडबड होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

कायदा व सुव्यवस्थेमुळे नकार ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीनंतर दोन समुदायांत तणाव आहे. पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप करून निषेध मोर्चाचे  आयोजन केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. यासोबतच त्यानंतरही शिवसेनेने मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले असून  मोर्चा काढणे लोकशाहीत अधिकार आहे. तो अधिकार वापरा, घोषणा द्या, परंतु तणाव निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका, असे शिवसेनेच्या पदाधिका-यांना स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना शुक्रवारी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद