शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : औरंगाबादकरांना शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 16:33 IST

किरकोळ कारणावरुन औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद -किरकोळ कारणावरुन औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (11 मे) रात्री उशिरा दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर जाळपोळ, दगडफेकीत झाले. 

सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शांतता ठेवा, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. शिवाय, परिसरात इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. 

(जाळपोळीत दिव्यांगाचा होरपळून मृत्यू)

दरम्यान, जमावाने केलेल्या जाळपोळीत जगनलाल छगनलाल बन्सीले (वय 62 वर्ष, शहागंज) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहागंज परिसरातील एका दुकानात जगनलाल शुक्रवारी (11 मे) झोपले होते. या हिंसाचारात शनिवारी (12 मे) पहाटे अज्ञातांनी त्या दुकानाला आग लावली. दुकानाच्या चहुबाजूंनी आग पसरली, तेव्हा आगीच्या झळांमुळे जगनलाल यांना जाग आली. या आगीतून जीव वाचवण्यासाठी त्यांनी आटापिटा केला. मात्र ते दिव्यांग असल्याने त्यांना दुकानातून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. 

मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले. तलवारी, चाकू, लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवाय, जालन्याहून अतिरिक्त कुमकदेखील मागवण्यात आली आहे.  दगडफेकीत 25 जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारSection 144जमावबंदी