शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence: जाळपोळ पोलिसांच्या मदतीनेच? 'त्या' व्हिडीओत पोलीस-दंगेखोर दिसले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 10:23 IST

जाळपोळ सुरू असताना पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका संशयास्पद

औरंगाबाद: दोन गटांकडून जाळपोळ सुरू असताना त्यामध्ये पोलिसांचाही सहभाग होता, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये मोठा वाद झाल्यानंतर त्यांनी जाळपोळ सुरू केली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ सुरू असताना त्यांच्यासोबत 10 पोलीस चालत होते, असं नऊ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमधून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जमाव वाहनं पेटवून देत असताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही. मात्र आता हा व्हिडीओ समोर आल्यानं पोलिसांवर मोठी नामुष्की ओढावली आहे. 'हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सर्व पोलिसांवर आणि हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,' असं आश्वासन औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलं. औरंगाबादमधील स्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी अतिरिक्त पोलीस संचालक (कायदा आणि सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनीही या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. 'कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पोलीस दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल,' असं त्यांनी सांगितलं. इमारतीच्या खिडकीतून चित्रित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जमाव पोलिसांसमोर गाड्या जाळताना दिसत आहेत. नवाबपुरा भागातील भारतीय नर्सिंग होम भागातील तोडफोड आणि जाळपोळ या व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.  

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार