शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत नियोजनाचा उडाला फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 22:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात मतदानासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा फज्जा उडाला. उस्मानाबाद उपकेंद्राच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहचल्या. तर अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठीची योग्य ती काळजी घेतली नसल्याचे समोर आले. या गोंधळातही प्राध्यापकांनी विक्रमी मतदान केले आहे.विद्यापीठाच्या अधिसभासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यात महाविद्यालयातील शिक्षक गटात १० जागा, विद्यापीठीय शिक्षकांसाठी ३, प्राचार्य ८ (दोन बिनविरोध), प्राचार्य ८ (दोन बिनविरोध), संस्थाचालक ४ (दोन बिनविरोध) आणि विद्यापरिषदेसाठी ७ (एक बिनविरोध) जागांचा समावेश होता. सकाळी आठ वाजता मतदानाला सुुरुवात झाली. हे मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालले. यात प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचलकांनी हिरारीने सहभागी होत मतदानाची आकडेवारीत भर घातली. पहिल्या टप्प्यातील मतदान पात्र-अपात्रेपासून सुरु असलेला गोंधळ मतदान होईपर्यंत कायम राहिला. अनेक मतदान केंद्रातील अधिका-यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते. ज्या सूचना होत्या त्यातील अनेक सुचनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष केंद्रांवर झालेलीच नसल्याचे स्पष्ट झाले. मतदान केंद्रावर पाळण्यात येणारे नियम, सुचना, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवरांचे ओळखपत्र या सर्वांमध्ये प्रत्यक्षात सावळा गोंधळ असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी नेते, मतदार नसलेले लोक मतदान केंद्रात बसून फोन करणे, मतदार मतदानासाठी जात असताना सूचना देण्याचे काम करत असल्याचेही दिसून आले. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र त्यांनी अनुपस्थित राहण्यालाच पसंती दिल्याबद्दलही सर्वत्र आश्चार्य व्यक्त होत आहे.

मतपत्रिका दुपारनंतर पोहचल्याविद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील मतदारांसाठीच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहचल्या. यानंतर मतदान झाले. या मतपत्रिका घेऊन जाणाºया गाडीत वाटेतच बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. मात्र उपकेंद्रातील मतदान विद्यापीठ विकास मंचला मिळणार नसल्यामुळे जाणिवपूर्वक मतपत्रिकाच पाठविण्यास विद्यापीठ प्रशासनाने कुचराई केल्याचा आरोप उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी केला आहे. तर कायमच उपकेंद्राकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रा. संभाजी भोसले यांनी सांगितले.

विद्यापीठात वाटल्या महाविद्यालयाच्या मतपत्रिकाविद्यापीठातील प्राध्यापकांसाठी स्वतंत्र गट निर्माण केलेला आहे. तरीही विद्यापीठातील मतदना केंद्रावर महाविद्यालयातील शिक्षकांसाठी असणाºया मतपत्रिका सुुरुवातीला वाटण्यात आल्याचा प्रकार घडला. मात्र अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. चंद्रकांत कोकाटे यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षकांच्या मतपत्रिका फाडून टाकल्या. तोपर्यंत काही मतदारांना महाविद्यालयातील शिक्षकांसाठी मतदान केल्याचे समजते. यावर डॉ. साधना पांडे यांनी त्या मतपत्रिका मतमोजणीत ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे सांगितले. 

उमेदवरांना आडवलेविद्यापीठात मतदान संपल्यानंतर मतपेत्या सिल करण्यासाठी उमेदवरांच्या सह्या घेतल्या जातात. या सह्या करण्यासाठी उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. राम चव्हाण मतदान केंद्रात जात असताना पोलिसांनी त्यांनाच आडवले. उमेदवार असल्याचे सांगितल्यानंतरही आत सोडण्यात आले नाही. शेवटी बाचाबाची झाल्यानंतर आत सोडण्यात आले. तर याच केंद्रावर काही वेळ मतदारांना लाल शाईचा पेन मतदान करण्यासाठी दिला होता.

मतपत्रिकेतही चुकाविद्यापरिषदेच्या गटात फॅकल्टी आॅफ इंटर डिसीप्लीनरी स्टडीजच्या प्रवर्गाची मतपत्रिकामध्ये उत्कर्षचे उमेदवार डॉ. प्रभाकर लहुराव कराड यांच्या नावासमोर पसंतीक्रमांक दर्शविणारी चौकट जाणिवपूर्वक लहान आकाराची बनवली असल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार उत्कर्ष पॅनलच्या पदवीधर गटाचे उमेदवार डॉ. भारत खैरनार यांनी डॉ. पांडे यांना दिली.

झालेल्या मतदनाची आकडेवारीगट एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारीमहाविद्यालयीन शिक्षक३४३४ ३२१९ ९३.७४विद्यापीठ शिक्षक १७२ १६८ ९७.६७संस्थाचालक १७४ १७२ ९८.८६प्राचार्य १०५ १०२ ९७.१५विद्यापरिषद ३४३४ ३२१९ ९३.७४

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद