शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महिना झाला तरी अपहृत मुलीचा पोलिसांना शोध लागेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:20 IST

पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही.

औरंगाबाद : पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही. उलट मुलीचा शोध घेऊ नका, असा दम संशयितांच्या नातेवाईकांनी मुलीच्या आई-वडिलांना दिला.   

याविषयी अधिक माहिती अशी की, कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलगी २७ एप्रिल रोजी औरंगपुऱ्यातील एस.बी. कॉलेजमध्ये गेली होती. या मुलीचे अपहरण निखिल पागोरे याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या अपहरणासाठी निखिलची आई आणि अन्य दोन जणांनी त्याला मदत केली. या घटनेपासून संशयित आरोपी निखिल आणि त्याची आई गायब आहे. सायबर क्राईमच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे नातेवाईकांना सांगितले जात आहे; मात्र सायबर क्राईम सेलकडून आरोपींचा ठावठिकाणा प्राप्त होताच पोलीस लगेच त्यांच्या मागावर जात नाहीत, परिणामी आरोपी तेथून दुसऱ्या ठिकाणी जातात. शिवाय ते सतत मोबाईल नंबर बदलून फिरत असतात. आरोपी हा त्याचा भाऊ, वडील आणि अन्य एका जणाच्या संपर्कात असतो. ही बाब पोलिसांना माहिती आहे, असा आरोप पीडित मुलीच्या आई-वडिलांनी केला. 

मुलीच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी मुलीचा शोध घेऊ  नका, म्हणून आरोपीचे नातेवाईक सतत तिच्या आई-वडिलांना धमकावत आहेत. काही दिवसांपूर्वी तर तिची मोठी बहीण आणि आई पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी मोपेडने पोलीस आयुक्तालयाकडे जात असल्याचे कळताच त्यांनी अचानक त्यांच्यासमोर रिक्षा उभी केली. यामुळे मोपेडस्वार माय-लेकींना अपघात झाला. या अपघातात माय-लेकी जखमी झाल्या. २६ मे रोजी पीडितेचे आई-वडील घरी असताना कृष्णा पागोरे आणि सूर्यभान पागोरे हे घरी आले आणि त्यांनी भावाविरोधात दिलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करू नका, अन्यथा तुम्हाला जिवे मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.

टॅग्स :KidnappingअपहरणSatara areaसातारा परिसरAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस