शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

औरंगाबादेत महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ३३ हजार जागा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 16:36 IST

शहरातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी उपलब्ध जागेचा आकडा दोन हजारांनी वाढला आहे.

ठळक मुद्देशहराच्या हद्दीत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार ३९२ एवढी आहे.

औरंगाबाद : शहरातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी उपलब्ध जागेचा आकडा दोन हजारांनी वाढला आहे. अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणीला सुरुवात झाली तेव्हा ११२ महाविद्यालयांमध्ये २९ हजार ८४५ जागा शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केल्या होत्या. मात्र मंगळवारी उपलब्ध जागांची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात उपलब्ध जागांचा आकडा ३३ हजार ३८८ वर पोहोचला आहे. या जागांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित आणि बायफोकल जागांचा समावेश आहे. शहराच्या हद्दीत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार ३९२ एवढी आहे.

अकरावीत प्रवेश घेण्यासाठी १ जूनपासूनच विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन नोंदणीला सुरुवात झाली होती. यात १२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना भाग-१ च भरण्यास उपलब्ध होता. यानंतर १३ जूनपासून भाग-२ उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षण उपसंचालक विभागाने सुरुवातीला उपलब्ध जागांची संभाव्य संख्या जाहीर केली होती. यात काही नवीन तुकड्यांना, महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यामुळे तीन हजारांपेक्षा अधिक जागा वाढल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार नसल्याचे चित्र आहे.

बायफोकलची आज गुणवत्ता यादी अकरावीमध्ये इलेक्ट्रॉनिकसह इतर तांत्रिक विषय असलेल्या बायफोकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (दि.२१) जाहीर होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका २२ जून रोजी मिळणार आहेत. त्यापूर्वी लागणाऱ्या यादीमुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन गुणपत्रिकांच्या आधारे तात्पुरते प्रवेश घ्यावे लागणार आहेत. मूळ गुणपत्रिका आणि टीसी दाखल केल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक खांडके यांनी दिली.

१९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणीअकरावीत प्रवेश घेण्यासाठी १९,१२९ विद्यार्थ्यांनी  बुधवारपर्यंत सायंकाळी आॅनलाईन नोंदणी केली होती. ही आॅनलाईन नोंदणी २५ जूनच्या ५ वाजेपर्यंत करता येईल. त्यानंतर २९ जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाणार आहे.

११२ महाविद्यालयांत उपलब्ध जागांची संख्याशाखा               अनुदानित  विनाअनुदानित    कायम             स्वयंअर्थसाहाय्यित    बायफोकल     एकूण                                                                 विनाअनुदानितकला                   ४,८९५         २,१६०                 १६०                        ९२०                       १०             ८,१४५वाणिज्य             २,१८५         १,१६०                  ००                       १,१३०                     ३८०            ४,८५५विज्ञान                 ४,८००        ४,५६०                 १,०८०                   ३,२१०                     ४,२६३      १७,९१३एमसीव्हीसी         १,६९०            ५७५                  २१०                        ००                         ००            २,४७५एकूण                   १३,५७०      ८,४५५                 १,४५०                   ५,२६०                    ४,६५३        ३३,३८८

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र