शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील ‘बाटू’च्या उपकेंद्राचा प्रस्ताव लांबणीवर; वर्षभरापूर्वी झाली होती घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:19 IST

मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देरायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच झालेली आहे.उपकेंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.

औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच झालेली आहे. घोषणेनंतर मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनीही ‘लोकमत’शी बोलताना यास दुजोरा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर हे छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’चे उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. उपकेंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. आता सरकारच्या पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. 

सरकारकडून जेवढ्या लवकर उपकेंद्राला मान्यता मिळून निधीची तरतूद होईल, तेवढ्या लवकर विद्यापीठ हे उपकेंद्र कार्यान्वित करेल, असेही डॉ. गायकर यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या पातळीवर निधीची कमतरता असल्यामुळे प्रस्तावाला विलंब होण्याचीही शक्यता आहे. यामुळे औरंगाबादेतील विद्यापीठाचे उपकेंद्र आता पुढील वर्षीच सुरू होईल. या शैक्षणिक सत्रात सुरू होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली असल्याचेही डॉ. गायकर यांनी सांगितले.विद्यापीठ प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव दोन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही टाकण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पाहून विद्यापीठ कोणत्या दिशेने कार्य करीत आहे. हे सर्वांनाच समजेल, असेही ते म्हणाले.

मराठवाड्याबाबत दुजाभावकेंद्र सरकार, राज्य सरकारकडून औरंगाबादेत मंजूर झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांसाठी निधी देताना राज्य सरकारकडून हात आखडता घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यासाठी मंजूर झालेल्या स्पा, आयसीटी, विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्था अशा विविध संस्थांना पुरेसा निधी देण्यात आलेला नाही. यात आता आणखी ‘बाटू’च्या उपकेंद्राची नव्याने भर पडली आहे. हे केंद्र सुरू झालेले नसल्यामुळे महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद