शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत जातात दररोज दोन वाहने चोरीस; ३ महिन्यांत १७५ दुचाकी गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 18:16 IST

चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी लंपास केल्याचे समोर आले.

ठळक मुद्देशहरातील वाहनांची संख्या अकरा लाखांपर्यंत गेली आहेगतवर्षी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ६३४ दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या होत्या.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहर पोलिसांना चकमा देऊन चोरटे रोज वेगवेगळ्या भागांतून दुचाकी आणि अन्य वाहने पळवीत आहेत. चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी लंपास केल्याचे समोर आले. यात तीन ट्रकचा समावेश आहे. 

शहरातील वाहनांची संख्या अकरा लाखांपर्यंत गेली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच दिवसेंदिवस शहरातील वाहनांच्या संख्येत भर पडत असते. प्रत्येक कुटुंबाकडे किमान एक आणि जास्तीत जास्त पाच ते सहा वाहने सध्या दिसून येतात. वाहनांची संख्या वाढल्यापासून वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून प्रत्येक नागरिक घरासमोरील रस्त्यावर आपली वाहने उभी करतो. विशेषत: गुंठेवारी भागात तर दहा ते पंधरा फूट रुंदीच्या गल्लीत दोन्ही बाजूने दुचाकी उभ्या करून ठेवल्या जातात. काही कंपन्यांच्या दुचाकींचे स्वीच लवकर नादुरुस्त होते. परिणामी कोणत्याही वाहनाच्या किल्लीने ती दुचाकी सुरू होती.

रोज होणाऱ्या वाहन चोरींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही वाहनचालक त्यांच्या दुचाकींना साखळदंड बांधतात; मात्र ९० टक्के वाहनमालक वाहनांच्या सुरक्षितेबद्दल दुर्लक्ष करतात. त्याचाच लाभ चोरटे घेत असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून शहरात दुचाकी चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे.गतवर्षी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ६३४ दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या होत्या. शिवाय २२ जीप आणि २१ ट्रक चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. 

चारचाकी वाहनांच्या चोऱ्या वाढल्या२०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये दुचाकी चोरींची संख्या घटविण्यात पोलिसांना यश आले; मात्र वाहनचोरी कायमस्वरूपी रोखणे शक्य झाले नाही. परिणामी यावर्षीही वाहनचोऱ्या जोरात सुरू आहेत. जानेवारी ते मार्चअखरेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. शिवाय तीन ट्रकचा यात समावेश आहे. 

- २०१६ मध्ये चोरीला गेलेल्या दुचाकींची संख्या-८१७- २०१७ मध्ये चोरीला गेलेल्या दुचाकी- ६३४- २०१६ मध्ये चोरीला गेलेल्या दुचाकींची संख्या-८१७- जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत चोरट्यांनी पळविलेल्या दुचाकी- १७३, ट्रक -३ 

टॅग्स :theftचोरीtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस