शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’च्या सीईओ पदाला नवीन वळण; पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 13:34 IST

Aurangabad ‘Smart City’ CEO controversy : महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडेच आजपर्यंत स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला होता.

ठळक मुद्देआस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. सीईओंनी महापालिकेचे आयुक्त किंवा प्रशासकांच्या अधिपत्याखाली काम करावे असा नियम

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या सीईओपदी नगरविकास विभागाने मागील महिन्यात बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीला ८ दिवसही उलटत नाहीत तोच नगरविकास विभागाच्या आदेशानुसार या पदाच्या भरतीसाठी चक्क जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे सीईओ पदाला आता नवीन वळण लागले आहे.

महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडेच आजपर्यंत स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला होता. आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक गेल्या महिन्यात नगरविकास विभागाने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बाबासाहेब मनोहरे यांची प्रतिनियुक्तीवर बदली केली. त्यांच्या नियुक्तीचे पडसाद राजकीय व प्रशासकीय वर्तुळात उमटले. मनोहरे यांनी सीईओपदाची सूत्रे हाती घेतली. स्मार्ट सिटीच्या खर्चाचे लेखापरीक्षण, ‘सुपर संभाजीनगर’ फ्लेक्सची चौकशी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हे प्रकरण ताजे असतानाच आता स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओपदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८ मार्च २०२१ पर्यंत सीईओपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

काय म्हणाले महापालिका प्रशासकया जाहिरातीबद्दल पत्रकारांनी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना विचारले असता ते म्हणाले की, नगरविकास विभागाची परवानगी घेऊनच जाहिरात काढण्यात आली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओंनी महापालिकेचे आयुक्त किंवा प्रशासकांच्या अधिपत्याखाली काम करावे, असे स्मार्ट सिटी मिशन व नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. नगरविकास विभागाच्या आदेशानुसारच सीईओपदासाठी जाहिरात काढली आहे. त्यानुसार मुलाखत घेऊन त्या पदावर नियुक्ती केली जाईल. नियुक्तीला स्मार्ट सिटी बोर्डाची मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी नगरविकास विभागाला पाठविले जाईल.

लेखापरीक्षण करण्याचा निर्णय आमचाचस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाचे ऑडिट करा, असे पत्र आपण पूर्वीच नागपूरच्या महालेखाकार (एजी ऑफिस) कार्यालयाला पाठविले आहे. अंतर्गत ऑडिट पूर्ण झाले असून तुम्ही तुमचे ऑडिट करा, असे त्यांना कळवले आहे असे आस्तिककुमार पाण्डेय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका