शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

औरंगाबाद आरटीओत दीडशेवर शिकाऊ चालक चाचणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:27 IST

मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहन आणि प्रशिक्षणात शासनाच्या अधिसूचनेनुसार बदल करण्याच्या सूचनेची दोन महिन्यांनंतरही अंमलबजावणी झालेली नाही.

ठळक मुद्दे अवजड वाहन लायसन्स चाचणी दोन महिन्यांपासून ठप्प

औरंगाबाद : मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहन आणि प्रशिक्षणात शासनाच्या अधिसूचनेनुसार बदल करण्याच्या सूचनेची दोन महिन्यांनंतरही अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी आरटीओ कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून अवजड वाहनांच्या लायसन्सची चाचणी प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे शिकाऊ लायसन्स काढलेल्या किमान दीडशेवर चालकांना (उमेदवार) मनस्ताप सहन करावा लागत आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने अवजड वाहनांच्या प्रशिक्षण पद्धतीत अनेक बदल केले. या बदलांनुसार चाचणीप्रक्रिया घेण्याचे आदेश देण्यात आले. शहरात ७ मोटार ड्रायव्हिंग स्कूल अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देतात. नव्या बदलांविषयी आरटीओ कार्यालयाकडून त्यांना माहिती देण्यात आली; परंतु ही माहिती अचानक प्राप्त झाल्याने डायव्हिंग स्कूलला बदल करण्यासाठी बदल करण्यात अडचणींना सामोरे जावे लागले. 

प्रशिक्षणातील नव्या बदलासाठी आरटीओ कार्यालयाने २६ सप्टेंबरपासून ही चाचणी बंद केली आहे. अवजड वाहनाच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्यासंदर्भात मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांना नोटीस बजावण्यात आली; परंतु दोन महिन्यांनंतरही बदलांच्या पूर्ततेअभावी चाचणीप्रक्रिया सुरू झालेली नाही. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांकडे शिकाऊ लायसन्स आहे; परंतु चाचणी प्रक्रियाच बंद असल्याने पक्के लायसन्स कधी मिळणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. 

रोजगाराचा प्रश्नआरटीओ कार्यालयात दररोज किमान २ ते ३ जणांची चाचणी होत असते. यानुसार किमान दीडशे जणांना चाचणीची नुसती वाट पाहावी लागत असल्याचे दिसते. लायसन्सअभावी रोजगाराच्या प्रश्नालाही अनेकांना तोंड द्यावे लागत असल्याची ओरड होत आहे.

हे बदल करणे आवश्यकमोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षण वाहनांत इंधन कार्यक्षमता मोजण्यासाठी योग्य उपकरण बसविणे, प्रशिक्षण कालावधीत इंधन कार्यक्षमतेची चाचणी ५ कि.मी.च्या ट्रॅकवर घेणे, इंधन कार्यक्षमतेसाठी वर्ग प्रशिक्षण देणे, आदी नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. 

लवकरच सुरुवातअवजड वाहन लायसन्सची चाचणी बंद असून, लवकरच ती पूर्ववत सुरू होईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. एकाच ड्रायव्हिंग स्कूलने बदल केलेला आहे; मात्र कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही.- स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा