शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेसाठी ‘संभाजीनगर’ हा भावनिक नव्हे तर अस्मितेचा मुद्दा - अंबादास दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:47 IST

Aurangabad Rename : भावनिक म्हणून नव्हे, तर अस्मिता म्हणून हा मुद्दा असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देगेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यावेळी हे विषय का मार्गी लागले नाहीत?

औरंगाबाद : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करणे हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नामकरणासाठी पाठपुरावा सुरूच राहील. भावनिक म्हणून नव्हे, तर अस्मिता म्हणून हा मुद्दा असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

ठाकरे सरकारने डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी भागातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुंठेवारी भागातील जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना फायदा करून देण्यासाठी शिवसेना प्रत्येक वॉर्डात मदत केंद्र सुरू करणार असल्याचेही आ. दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत होती. गुंठेवारीची मुदत वाढविण्याच्या प्रस्तावावर भाजप नगरसेवकांच्या सह्या आहेत, असा दावा भाजपा करीत आहे. गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यावेळी हे विषय का मार्गी लागले नाहीत? असा प्रतिप्रश्न दानवे यांनी केला. महापालिका निवडणुकीमुळे संभाजीनगर नामकरण, गुंठेवारीसारखे भावनिक विषय शिवसेना समोर आणत आहे का ? या प्रश्नावर दानवे म्हणाले, अस्मितेचे मुद्दे उचलावेच लागतील. गुंठेवारी नियमितीकरणानंतर पीआर कार्डचा विषयही मार्गी लागेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad renameऔरंगाबादचे-नामांतरShiv Senaशिवसेना