शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ते पुणे कनेक्टिव्हीटी वाढणार; रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 15:12 IST

येथील ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग, जालन्यातील स्टील उद्योग व ड्रायपोर्ट आणि डीएमआयसीला चालना मिळण्याच्या हेतूने हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण रेल्वे राज्यमंत्र्यांशी प्राथमिक बोलणी

औरंगाबाद : मराठवाड्याच्या उद्योगाला चालना मिळण्यासाठी औरंगाबाद ते पुणे या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे. सीएमआयए, मसिआ, सीआयआय आदी उद्योग संघटनांशी चर्चा करून या मार्गासाठी सर्व डाटा संकलित केला असून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

येथील ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग, जालन्यातील स्टील उद्योग व ड्रायपोर्ट आणि डीएमआयसीला चालना मिळण्याच्या हेतूने हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव तयार करताना वार्षिक करभरणा, दळणवळण आणि कच्चा व पक्का माल निर्यातीची टननिहाय क्षमता याचा विचार करण्यात आला आहे. मराठवाड्यात उद्योगांची संख्या, लघु व मध्यम उत्पादक आदीबाबत प्रस्तावात माहिती आहे. प्रवासी वाहतुकीसह इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणून या मार्गाचा विचार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे शंभर टक्के निधी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे निधीच्या पर्यायांचा विचार होत आहे. निधीसाठी राज्य शासनाला काही वाटा उचलावा लागणार आहे. एमआयडीसीही यासाठी मदत करण्यासाठी पुढे येऊ शकते.

काय फायदा होईल या मार्गामुळेहा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर मराठवाड्याचा विकासदर वाढण्यास मदत होईल. उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल. डीएमआयसीमध्ये गुंतवणूक वाढणे शक्य होईल. सध्या औरंगाबाद ते पुण्यासाठी असलेली कनेक्टिव्हीटी सुमार दर्जाची आहे. औरंगाबादेत ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, बियाणे, औषधी, ब्रेव्हरिज आदी उद्योग आहेत. शेजारी जालना जिल्ह्यात स्टील उद्योगांची संख्या मोठी आहे.

समृध्दीने सव्वा तासात शिर्डीजिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, समृध्दी महामार्गावर कोकमठाण वरून शिर्डीकडे जाण्यासाठी इंटरचेंज करण्याचा विचार झाला आहे. समृध्दी महामार्ग कोकमठाण पर्यंत वापरला तर तासाभरात शिर्डीला जाता येईल. यावर काम सुरू आहे. माळीवाडा इंटरचेंजवरून समृध्दीवर जाता येईल. तेथून पुढे कोकमठाण आहे, तेथून सहा किलोमीटर शिर्डी आहे. एमएसआरडीसी अधीक्षक अभियंत्यांसोबत आज सकाळी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी त्याबाबत तयारी दर्शविली आहे. सध्याच्या रस्त्याने शिर्डीसाठी तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतो.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी चर्चानवीन रेल्वेलाईनमुळे उद्योग, पर्यटनाला फायदा होईल. पुण्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल. या रेल्वे लाईनबाबत रेल्वे खात्याशी बोलणे सुरू आहे. हा प्रस्ताव मूर्त रूपात येण्यास थोडा वेळ लागेल. याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा झाली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादPuneपुणेtourismपर्यटनMIDCएमआयडीसी