शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : तंबीमुळे अतिक्रमण हटावचे ढोंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:00 IST

शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर पन्नास टक्क्यांहून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांकडे आजपर्यंत डोळेझाक करण्याचे काम मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने केले.

ठळक मुद्देदिवसभर वसुली : हातगाड्या, विक्रेते, अनधिकृत बांधकामांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर पन्नास टक्क्यांहून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांकडे आजपर्यंत डोळेझाक करण्याचे काम मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने केले. या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर ‘वसुली’त मग्न असतात. हे काम संपल्यावर कार्यालयात थंडगार कूलर लावून हवा खाण्याचे काम करतात. बुधवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी या विभागाची चिरफाड करून कामाला लावले. त्यानंतर पथकाने दिल्लीगेट येथील फर्निचर विक्रेते, पैठणगेट येथील हातगाड्यांवर कारवाईचा बडगा उगारला.शहरातील कोणत्याही रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी दुचाकी वाहन चालविणे अवघड झाले आहे. चारचाकी वाहनधारकांना शहरात वाहन चालवायचे असेल तर पहिल्या आणि दुसºया गिअरमध्येच वाहन चालवावे लागते. प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजंूनी अतिक्रमणे झाली आहेत. शहरात महापालिका आहे किंवा नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहागंज, सिटीचौक, मछली खडक, रंगारगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा, मध्यवर्ती बसस्थानक, टी. व्ही. सेंटर, आविष्कार कॉलनी, गजानन महाराज मंदिर रोड, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, रोशनगेट, चंपाचौक, लोटाकारंजा आदी अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शहरातील अतिक्रमणांबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. बुधवारी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिष्टमंडळासह महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन अतिक्रमणे हटविली जात नसल्याबंद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संतप्त घोडेले आणि सभागृह नेते विकास जैन यांनी प्रशासकीय विभागात धाव घेतली. याठिकाणी अधिकारी-कर्मचारी चक्क कूलर आणि पंख्यांची थंड हवा खात बसले होते. त्यांना टप्पा क्रमांक दोनच्या इमारतीच्या मोकळ्या जागेत बोलविण्यात आले. कर्मचारी-अधिकारी आता कार्यालयात थांबणार नाही. सर्वांनी मोहिमेवर जाऊन अतिक्रमणे हटवावीत. कारवाई करणार नाही, तोपर्यंत परत फिरू नये, अशी तंबी त्यांना देण्यात आली.पथकाची दिखाऊगिरी१५ पोलीस, १३ इमारत निरीक्षक, दोन प्रशासकीय अधिकाºयांसह अतिक्रमण हटाव विभागाचा ताफा महापालिका कार्यालयाबाहेर पडला. दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात दिल्लीगेट ते रोजेबाग रस्त्यावरील जुने फर्निचर जप्त करण्यात आले. सहा गाड्या भरून जुने फर्निचर जप्त करण्यात आले. पैठणगेट ते सिटीचौक रस्त्यावरील १२ हातगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका