शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये १ ते ४० वयोगटातील रुग्ण अधिक मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 19:33 IST

औरंगाबादेत दीड महिन्यापासून रोज कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. यात ५१ ते ८० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे.

ठळक मुद्दे ज्येष्ठांनाच धोका का, कमी वयात मृत्यूचे प्रमाण कमी का?९० टक्के मृत्यू हे ५० वर्षांवरील असल्याचे समोर आले

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबादेत १ ते ४० वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. मात्र, सर्वाधिक रुग्ण असूनही या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. ज्येष्ठांनाच धोका का, कमी वयात मृत्यूचे प्रमाण कमी का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

औरंगाबादेत दीड महिन्यापासून रोज कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. यात ५१ ते ८० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे. या वयोगटातील रुग्णसंख्या जवळपास २५ टक्के आहे; परंतु याच वयातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याउलट १ ते ४० वयाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असूनही, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. शहरात बुधवारपर्यंत कोरोनाच्या १२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ४० वर्षांखालील केवळ ९ रुग्णांचा समावेश आहे. 

वयाच्या ४० वर्षांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरोना व्हायरस या वयोगटातील व्यक्तींवर अधिक लवकर हल्ला करतो; परंतु तरुण, लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. सर्दी, खोकला यासारख्या समस्यांवर लहान मुले सहजपणे लढतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचा तरुण आणि लहान मुलांवर परिणाम होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ वर्षांखालील ४८ मुले दाखल झाली होती. हे सर्व उपचार घेऊन घरी परतल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

९०% मृत्यू ५० वर्षांवरीलसमितीच्या माध्यमातून दर १५ दिवसांनी डेथ आॅडिट केले जाते. ९० टक्के मृत्यू हे ५० वर्षांवरील असल्याचे यातून समोर आले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.

वयोमानानुसार कोरोनाग्रस्तांचे प्रमाणवय               टक्केवारी१ ते १०            ७.१११ ते २०          ११.२२१ ते ३०           १९.५३१ ते ४०           २२.५४१ ते  ५०          १४.२५१ ते  ६०           १२.८६१ ते  ७०           ८.९७१ ते ८०           ३.२८० वरील             ०.९ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद