शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad: औरंगाबाद ते पुणे फक्त सव्वा तासांत, नितीन गडकरींनी केली नवीन द्रुतगती मार्गाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 12:52 IST

Aurangabad: "2024 पर्यंत औरंगाबादमध्ये 25000 कोटी रुपयांचे कामे पूर्ण करणार."

औरंगाबाद: भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते धुळे-सोलापूर हायवेसह विविध रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. दरम्यान, यावेळी नितीन गडकरींनी औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे, नवीन औरंगाबाद-पुणे दुर्तगती महामार्ग. या सोहळ्याला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. 

औरंगाबाद मेट्रोवर काम सुरूआपल्या भाषणात नितीन गडकरींनी भाजपच्या कामांचा पाढा वाचला. तसेच, 2024 पर्यंत औरंगाबादमध्ये 25000 कोटी रुपयांचे कामे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी त्यांनी औरंगाबादमध्ये भविष्यात मेट्रो येणार असल्याचेही सांगितले. यासाठी डीपीआर तयार असून, महामेट्रोकडून त्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, 2024 पर्यंत मराठवाड्यातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे करणार असंही ते म्हणाले.

नवीन द्रुतगती मार्गाची घोषणाऔरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती मार्गाची घोषणा गडकरींनी यावेळी केली. यासाठी 10,000 कोटींचा खर्च होणार आहे. बीड-नगर-पैठण या मार्गाने या रस्ता जाईल. त्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे, पुढच्या वेळेला आल्यावर याचे भूमिपूजन करणार, असंही ते म्हणाले. या नवीन रस्त्यामुळे औरंगाबाद ते पुणे अवघ्या सव्वा तासात पूर्ण होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. याशिवाय, येत्या काळात रोप वे बाबात आम्ही सकारात्कमक असून, त्याबाबत प्रस्ताव द्या, आम्ही मंजूर करू, असेही त्यांनी मंचावर उपस्थित नेत्यांना म्हटले.    

नितीन गडकरींच्या हस्ते या मार्गांचे लोकार्पण

नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजनही केले. राष्ट्रीय महामार्ग 752 मधील औरंगाबाद ते पैठण चौपदरीकरण (42 किमी) या 1670 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन केले जाईल. दौलताबाद टी पॉइंट ते माळीवाडा, माळीवाडा ते देवगाव रंगारी ते शिऊर 185 कोटींचा रस्ता, कसाबखेड्यापासून देवगाव रंगारी (10 किमी) एकूण (किंमत 47 कोटी) रस्त्याचेही भूमिपूजन केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादPuneपुणे