शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

Aurangabad News: मारुतीचे इंजिन अन् स्प्लेंडरची चेन; औरंगाबादच्या रँचोने घरातच बनवले हेलिकॉप्टर, पहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 13:37 IST

Video: लॉकडाउन काळात युट्यूबवरील व्हिडिओ पाहून हॅलिकॉप्टर बनवले. उडवायला गच्चीवर गेला, पण...

औरंगाबाद: सोशल मीडियावर अनेकदा 'देसी जुगाड'चे व्हिडिओ व्हायरल होत असतात. देसी जुगाड म्हणजे, टाकाऊ किंवा भंगार वस्तुंपासून एखादी चांगली-उपयोगी वस्तू बनवने. अशीच एक आगळी-वेगळी वस्तू औरंगाबादच्या रॅचोने तयार केली आहे. ITIचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने घरीच चक्क हेलिकॉप्टर तयार केले आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्याने मारुती कारचे इंजिन आणि गिअर बॉक्स, स्कूटीचा पेट्रोल टँक आणि हेलिकॉप्टरच्या टेल रोटरसाठी स्प्लेंडरची चैन वापरली आहे. पण, दुर्दैवाने त्याची टेस्ट राईड फसली... 

लॉकडाउनमुळे नोकरी गेली, पण कल्पन सुचलीघरातच चक्क हेलिकॉप्टर तयार करणाऱ्या रँचोचे नाव सतीश मुंडे आहे. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे, वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी तो घर चालवण्यासाठी कंपनीत कामाला लागला. पण, दुर्दैवाने लॉकडाउनमध्ये त्याची नोकरी गेली. लॉकडउन काळात काय करावे, हा प्रश्न सतत त्याच्या मनात यायचा. या काळात युट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवण्याचे ठरवले. यासाठी त्याने आपली तीन वर्षांची जमापुंजी पणाला लावली.भंगारातून साकारले हेलिकॉप्टरयुट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने भंगार वस्तूंपासून हेलिकॉप्टर तयार केले. यात त्याने मारुती कारचे इंजिन आणि गिअर बॉक्स, स्कूटीचे पेट्रोल टँक आणि हेलिकॉप्टरच्या टेल रोटरसाठी स्प्लेंडरची चैन बसवली. असा सगळा 'देसी जुगाड' करत त्याने हेलिकॉप्टर तयार केले. यानंतर त्याने या हेलिकॉप्टरची टेस्ट राईड घेण्याचा प्रयत्न केला, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नसल्यामुळे हेलिकॉप्टर उडाले नाही. पण, औरंगाबादच्या ITI महारोजगार मेळाव्यात हेच हेलिकॉप्टर सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरले. 

हवेत उडणाऱ्या गोष्टींची आवडऔरंगाबाद येथील राँचो सतीश मुंडेला हवेत उडणाऱ्या गोष्टींची लहानपणापासूनच आवड आहे. बारावीचे शिक्षण झाल्यावर सतीशने हेलिकॉप्टर तयार करायचे ठरवले होते. अखेर त्याने लॉकडाउन काळात स्क्रॅपमधील वस्तूंपासून रांजणगाव येथे हेलिकॉप्टर तयारही आहे. यासाठी त्याला 2 ते अडीच लाख रुपयांचा खर्च आला आहे. पण, आता पैसे संपल्यामुळे हेलिकॉप्टरच्या कव्हरिंगचे काम अर्धवट राहिले आहे. सतीश मूळ बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी असून, तो सध्या औरंगाबादच्या रांजणगाव शेणपुंजी येथे कुटुंबीयांसमवेत राहतो. सतीशला हेलिकॉप्टरच्या उर्वरित कामासाठी अजून 1 ते दीड लाख रुपये लागणार असून, एखाद्या वर्षात याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्याला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJara hatkeजरा हटके