शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

त्याने श्वास घेतला आणि सर्वांनीच नि:श्वास सोडला, डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:26 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाची छाती हाताने दाबून (सीपीआर), छातीवर शाॅक (डी. सी.) देऊन रुग्णाचा जीव वाचविल्याचा ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाची छाती हाताने दाबून (सीपीआर), छातीवर शाॅक (डी. सी.) देऊन रुग्णाचा जीव वाचविल्याचा प्रसंग तुम्ही चित्रपटात अनेकदा पाहिला असेल. असाच काहीसा प्रसंग जिल्हा रुग्णालयात घडला. छाती दुखते म्हणून रुग्णालयात आलेला तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अचानक कोसळला. त्याची नाडीही लागत नव्हती, पण अवघ्या २० मिनिटांत डाॅक्टर आणि परिचारिकांनी सीपीआर, तीन वेळा शाॅक ट्रिटमेंट देत शर्थीचे प्रयत्न केले आणि रुग्णाचा जीव वाचला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात २९ वर्षीय तरुण छातीत दुखते म्हणून बाह्यरुग्ण विभागात आला होता. रुग्णालयात येताच तो अचानक खाली कोसळला. हा प्रकार लक्षात येताच डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यास अपघात विभागात दाखल केले. या रुग्णाची नाडी लागत नव्हती, रक्तदाब लागत नव्हता. अशा परिस्थितीत क्षणाचाही विलंब न करता ‘सीपीआर’ देण्यास सुरुवात करण्यात आली. आवश्यक इंजेक्शनसह त्याला रक्तदाबाचे इंजेक्शन देण्यात आले. रुग्णाला तीन वेळा शाॅक देण्यात आला. तिसऱ्या शाॅकनंतर रुग्णाचा श्वासोच्छवास सुरू झाला आणि सर्वांनी नि:श्वास सोडला. या रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. प्रकृती सामान्य झाल्यानंतर त्यास अँजिओप्लास्टीसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अँजिओप्लास्टी झाली असून, रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले.

मित्राने ओळखले गांभीर्य...

सदर तरुण हा मित्रासोबत रुग्णालयात आला होता. त्याला काही दिवसांपासून छातीत दुखण्याचा त्रास सुरु होता. काही होत नाही म्हणून दुखणे अंगावर काढत होता; मात्र मित्राच्या सल्ल्यामुळे तो रुग्णालयात आला व रुग्णालयात कोसळला. हा प्रकार रुग्णालयाबाहेर कुठे झाला असता तर जीव धोक्यात जाण्याची भीती होती, असे डाॅक्टरांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डाॅ. सुनील गायकवाड, डाॅ. कीर्ती तांदळे, डाॅ. हेमंत मरमठ, डाॅ. संजय वाकूडकर यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णासाठी प्रयत्न केले. रुग्णालयात असा प्रसंग प्रथमच अनुभवास आला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद