शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

फॉगिंग मशीनच्या आगीत मनपा आरोग्य कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:23 IST

जखमी आरोग्य कर्मचाऱ्यावर घाटी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देसिडको एन 9 भागातील पवन नगर फवारणी करताना घडली दुर्घटना

औरंगाबाद : औषध फवारणी करत असताना अचानक फॉगिंग मशीनला अचानक आग लागल्याने  मनपाच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२३ )  सकाळी ८ वाजेच्या दरम्यान झाली. निवृत्ती वाघ असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून ते ३५ टक्के भाजले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ८  वाजता  महापालिकेच्या आरोग्य विभागातील मलेरिया कक्षात काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्ती वाघ (52) नेहमीप्रमाणे सिडको एन 9 भागातील पवन नगर येथे औषध फवारणी करीत होते. फॉगिंग मशिनच्या सहाय्याने काम सुरू असताना वाघ यांच्या पाठीवरील मशीनने अचानक पेट घेतला. या घटनेत वाघ 35% जळाले आहेत. त्यांना त्वरित घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करत असताना नेमकी आग कशामुळे लागली याची चौकशी महापालिका प्रशासन करीत आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली आहे. यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपययोजना केल्या जात आहेत. साचलेले पाणी शोधून ते रिकामे करणे, मच्छरांसाठी औषध फवारणी करणे अशा उपयायोजना शहरात राबविण्यात येत आहेत. या दरम्यान झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfireआगgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी