शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्ड रचनेच्या घोळानंतर आता एक लाख मतदारांची नावे यादीतून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 19:31 IST

विशेष बाब म्हणजे दोन दिवस उलटल्यानंतरही मनपाच्या वेबसाईटवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. 

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्या सब कुछ मॅनेज  तीन विद्यमान नगरसेवकांची नावे नसल्याचा धक्कादायक प्रकार 

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचनेत प्रचंड घोळ केल्यानंतर निवडणूक विभागाकडून अद्यापही जादूचे प्रयोग सुरू आहेत. सोमवारी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या वॉर्डनिहाय मतदार याद्यांमधील तब्बल १ लाखाहून अधिक मतदारांची नावेच गायब झाली आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. बुधवारी महापालिकेकडे मतदार याद्यांमधील घोळ सुरू असल्याच्या तक्रारींचा पाऊस सुरू होता. विशेष बाब म्हणजे दोन दिवस उलटल्यानंतरही मनपाच्या वेबसाईटवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. 

मनपाच्या निवडणूक विभागाला विधानसभेच्या मतदारयाद्यांची वॉर्डनिहाय विभागणी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. मनपा कर्मचाऱ्यांनी हे काम एवढ्या सुबकतेने केले की, एका वॉर्डातील मतदार दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वॉर्डात टाकले आहेत. अनेक वॉर्डांतील हजारो नावे गायब आहेत. आसपासच्या कोणत्याच वॉर्डांमध्ये ही नावे सापडत नसल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापौर, निवडणूक विभागाकडे केल्या. वॉर्डांची लोकसंख्या आणि मतदारसंख्या यांचे समीकरण जुळत नसल्याचे चित्र आहे.  

समर्थनगरातून दोन हजार मतदार गायबसमर्थनगर वॉर्डातील तब्बल दोन हजार मतदारांची नावे यादीत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी केला आहे. २०१५ साली समर्थनगर वॉर्डात ८२५६ मतदार होते. मागील पाच वर्षांत काही नव मतदारांची भर पडलेली आहे. त्यामुळे ही संख्या मागीलवेळेपेक्षा किंचित वाढणे अपेक्षित होते. आता समर्थनगर वॉर्डाची मतदारसंख्या ६९९३ एवढीच आहे. वॉर्डातील दोन हजार नावे कुठे गेली असा सवाल राजूरकर यांनी केला आहे.

बायजीपुऱ्यातही घोळबायजीपुरा वॉर्डातील अडीच हजार नावे संजयनगर वॉर्डात टाकण्यात आली आहेत. कलीम कुरेशी यांनी त्याबाबत आक्षेप दाखल केला आहे. याच पद्धतीने भगतसिंगनगर वॉर्डातील अनेक नावे मयूर पार्क वॉर्डात टाकण्यात आल्याचा आक्षेप वैजयंता मिसाळ यांनी नोंदविला आहे.

प्रगणकांवर जबाबदारी झटकलीमहापौर नंदकुमार घोडेले यांनी मतदार याद्यांतील घोळांबाबत मनपा निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सुमंत मोरे यांच्याकडे विचारणा केली. त्यावर मोरे यांनी नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी मतदार याद्यांचे काम केले, असे सांगत त्यांच्याकडे बोट दाखविले, तर सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षक प्रगणक होते, त्यांनीच हे काम केले, असे म्हणत जबाबदारी झटकली. प्रारूप मतदारयादी नंतर दुरुस्त होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कुरेशी कुटुंबियांनी दिला उपोषणाचा इशारानगरसेविका शबनम कलीम कुरेशी, नगरसेविका मलिका हबीब कुरेशी आणि नगरसेविका खतिजा कुरेशी या एकाच कुटुंबातील तिन्ही नगरसेविकांची नावे नवीन मतदार यादीतून गायब  झाली आहेत. मतदार यादीत नावच नसेल, तर निवडणूक लढवायची कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मात्र, तेथील ६२२ मतदारांचा एक भागच यादीतून गायब झालेला आहे. कलीम कुरेशी यांनी दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी महापौरांकडे केली आहे. तसेच मतदार यादीतील घोळ तात्काळ मिटला नाही, तर तिन्ही नगरसेविका, मी स्वत: आणि आमच्या भागातील नागरिक उपोषणाला बसतील, असे कलीम कुरेशी यांनी जाहीर केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक