शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रक्रियेत औरंगाबाद मनपाचे ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:37 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.

ठळक मुद्देयंत्र सामग्री एक महिन्यापासून पडून : चिकलठाणा, रमानगर, जकात नाक्यावर शेडच नाही

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले नाहीत. अधिकाºयांमधील बेबनाव, नियोजनाचा अभाव आदी कारणांमुळे कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहण्यापूर्वीच वादाच्या भोवºयात अडकले आहेत. युद्धपातळीवर शेड उभारणी, मशिनरी बसविणे ही कामे प्रशासनाकडूनच कासवगतीने सुरू आहेत. येणाºया दोन महिन्यांपर्यंत एक किलो कचºयावरही प्रक्रिया होणे अशक्य आहे.चार दिवसांमध्ये कचºयावर प्रक्रिया सुरू होईल, असा दावा महापालिका प्रशासन पदाधिकारी १५ आॅगस्टपासून करीत आहेत. हा दावा किती खरा आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख कचरा प्रक्रिया केंद्रांवर पाहणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे प्रत्येकी १६ टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूर येथील कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने २ आॅगस्टपासून मध्यवर्ती जकात नाक्यावर यंत्रसामग्री अक्षरश: धूळखात पडून आहे. जकात नाक्यावर मनपा प्रशासनाने शेड उभारले. या शेडमध्ये मशीन बसूच शकत नाही. आता दुसरे शेड उभारण्यात येणार आहे. चिकलठाण्यात शेड उभारणीचे काम जमिनीतच आहे. या ठिकाणी केंद्रीय कचरा प्रक्रिया केंद्र, छोट्या मशीनसाठी स्वतंत्र शेड उभारण्याचा विचार आहे. आणखी दोन ते तीन महिने मनपाकडून शेड उभारणे, थ्री फेस लाईटचे मीटर आणून देणे, पाणी या सुविधा देणे अशक्य आहे. रमानगर स्मशानभूमी येथे शेड उभारणीचे कामच सुरू झालेले नाही.चिकलठाण्याची अवस्था नारेगावसारखीमागील तीन महिन्यांपासून महापालिका चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर कचरा टाकत आहे. या कचºयात मेलेली जनावरे, दुर्गंधी, कचºयातून बाहेर निघणारे घाण पाणी यामुळे परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे.या भागातील नागरिकांकडून होणारा विरोध अत्यंत रास्त असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी मनपाने कचºयाचा डोंगर तयार केला आहे, तेथे दोन मिनिटेही थांबणे अशक्य आहे.पडेगाव, चिकलठाण्याचे काय?पडेगाव, चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टनाचे दोन मोठे प्रकल्प उभारण्याचे काम मायोवेसल कंपनीला दिले आहे. या कंपनीवर होत असलेले आरोप, स्थायी समिती सदस्यांनी केलेले बंड, कंपनीसोबत होणारा करार वादाच्या भोवºयात सापडला आहे.आणखी सहा महिने तरी ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होणार नाही. २४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाºया शेडच्या कामाचा श्रीगणेशाच झालेला नाही. शेड उभारणीसाठी कंत्राटदाराला मनपा अधिकारीच अजिबात सहकार्य करायला तयार नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न