शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेचे पीपीई, अँटिजन कीट संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:43 IST

दररोज साधारणपणे दीडशे ते दोनशे पीपीई कीट लागतात.

ठळक मुद्देअँटिजनची दिली ऑर्डर कीट घालूनच रुग्णांची तपासणी

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केलेले पीपीई कीट, अँटिजन कीट  संपले आहेत. २० हजार अँटिजन कीटची खरेदी करण्याची ऑर्डर महापालिकेने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेकडून मार्च महिन्यापासून रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट आवश्यक आहेत. पीपीई कीट घालूनच रुग्णांची तपासणी केली जात आहे. तीन प्रकारच्या पीपीई कीटची खरेदी मनपाला करावी लागत आहे. सुरुवातीला सरकारकडून पीपीई कीट प्राप्त झाले होते. त्यानंतर मात्र मनपाने पीपीई कीटची खरेदी सुरू केली. पहिल्या टप्प्यात डॉक्टरांसाठी एक हजार, कर्मचाऱ्यांसाठी तीन हजार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता तीन हजार याप्रमाणे ७ हजार पीपीई कीटची खरेदी करण्यात आली होती.

हे पीपीई कीट संपल्यानंतर पुन्हा पीपीई कीट खरेदी केले. दररोज साधारणपणे दीडशे ते दोनशे पीपीई कीट लागतात. त्यामुळे पीपीई कीटची वारंवार खरेदी करावी लागते. सध्या मनपाच्या आरोग्य विभागातील पीपीई कीट संपल्यामुळे कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मागील महिन्यात शासनाने  महापालिकेला कोविडसाठी  कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, अशी विचारणा केली होती. शासनाकडून काही पीपीई कीट येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महिनाअखेर व्यापाऱ्यांची तपासणीऑक्टोबर महिनाअखेर शहरातील व्यापाऱ्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अँटिजन टेस्ट कीटचीही खरेदी करण्यात आलेली आहे. सुरुवातीला सरकारकडून पाच हजार कीट मिळाले. त्यानंतर दिल्ली येथील एजन्सीकडून मनपाने चार टप्प्यांत सुमारे दोन लाख कीट खरेदी केले होते. त्यानंतरही २० हजार कीटची खरेदी करण्यात आली. सध्या शहरातील ११ आरोग्य केंद्रे आणि पाच कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना चाचणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका