शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

औरंगाबाद महानगरपालिकेची मोफत अंत्यविधी योजना पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 4:19 PM

शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना आता पुन्हा सुरू होणार आहे.

औरंगाबाद : मागील साडेतीन वर्षांपासून बंद असलेली स्व. बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना आता पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे. शहरातील सहा स्मशानभूमीमध्ये ही योजना वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. ही संस्था विजेवर चालणारे यंत्र व गौऱ्यांद्वारे मृतांवर अंत्यविधी करणार आहे. त्यासंबंधीचा धोरणात्मक प्रस्ताव १८ जानेवारीच्या सभेत मंजुरीसाठी येणार आहे.

२०१४ मध्ये तत्कालीन महापौर कला ओझा व उपमहापौर संजय जोशी यांनी पुढाकार घेत मोफत अंत्यविधी योजनेस सुरुवात केली होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योजना सुरू झाली होती. वर्षभरानंतर ही योजना बंद पडली. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने या योजनेसाठी आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव पालिकेसमोर ठेवला. विश्व हिंदू परिषदेचे राजेश जैन व वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनचे व्यवस्थापक अभिषेक उटांगडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी चर्चा करून प्रायोगिक तत्त्वावर शहरात सहा ठिकाणी मोफत अंत्यविधी योजना राबविण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रतापनगर, कैलासनगर, एन-६, बनेवाडी, मुकुंदवाडी, पुष्पनगरी या सहा ठिकाणी मशीन सीएसआर फंडातून बसविण्यात येणार आहेत. एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास साडेचार हजार रुपयांचा खर्च येतो. निम्मा खर्च संबंधित संस्था उचलणार असून, उर्वरित खर्च पालिकेकडून दिला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. खर्चासंबंधीचा धोरणात्मक प्रस्ताव १८ जानेवारीच्या सभेत ठेवून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका