शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

महानगरपालिका स्मार्ट सिटी योजनेत १०० कोटीतून ५० इलेक्ट्रिक बस घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:49 IST

बस खरेदीला लागणार १०० कोटी

ठळक मुद्देमहापालिका केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविणारमनपाला भेडसावतोय जागेचा प्रश्न 

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने १०० शहर बस खरेदी केल्या आहेत. त्यातील ८३ बसेस मनपाला प्राप्तही झाल्या आहेत. आणखी ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा दोन दिवसांपूर्वी एका आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. बस खरेदीसाठी महापालिका लवकरच राज्य शासनामार्फत केंद्राला प्रस्ताव पाठविणार आहे.

शहर बससेवेचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या दालनात एसटी महामंडळाचे प्रशांत भुसारी, सहायक आयुक्त सुरेश कवडे, मो. रा. थत्ते आणि इतर अधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. मनपाकडे १०० पैकी ८३ बसेस आल्या आहेत. उर्वरित बसेस पंधरा दिवसांत प्राप्त होणार आहेत.  शहरात स्मार्ट सिटी योजनेतील १०० बसेस चालतील. स्मार्ट सिटी प्रकल्पातून एकूण १५० बस घ्यायच्या आहेत. आतापर्यंत मनपाने ३६ कोटी रुपये खर्च करून १०० बसेस खरेदी केल्या आहेत. शहरातील प्रदूषण लक्षात घेऊन उर्वरित ५० बसेस या पुणे, मुंबईच्या धर्तीवर इलेक्ट्रिक असाव्यात, अशी चर्चा बैठकीत झाली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही इलेक्ट्रिक बस खरेदीचा आग्रह धरला होता. स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीत ५० बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविण्याचे आदेश घोडेले यांनी दिले. स्मार्ट सिटीतून प्राप्त २८३ कोटींपैकी ३६ कोटींच्या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. 

एका बसची किंमत दोन कोटीडिझेलवर चालणाऱ्या बसेसपेक्षा इलेक्ट्रिक बस अत्यंत महाग आहेत. एका बसची किंमत २ कोटी रुपये आहे. बसच्या बॅटरीची किंमत ५० लाख रुपये असून, दर तीन ते पाच वर्षांनी बसेसचे काम करावे लागते. हा खर्च मनपाकडे नसल्याने शासनाने त्यांच्या स्तरावर बसेस खरेदी करून देण्याचाही प्रस्तावात समावेश असणार आहे.

मनपाला भेडसावतोय जागेचा प्रश्न शहरात मनपाकडे मोठी जागा नाही. सध्या शहर बस एस.टी. महामंडळाच्या डेपोत उभ्या कराव्या लागत आहेत. मनपाला स्वतंत्र डेपो तयार करावा लागणार आहे. महामंडळाकडे त्यासाठी रेल्वेस्टेशनसह इतर ठिकाणीही जागा उपलब्ध असल्याने ही जागा ६० वर्षे भाडेतत्त्वावर मनपाला मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून महामंडळाला पाठविणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर