शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

... तर औरंगाबाद महापालिकेची होणार दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:36 IST

देशभरातील ६२ छावणी परिसर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास औरंगाबाद महापालिकेची डोकेदुखी वाढणार आहे.

ठळक मुद्देछावणीही महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव १८ खेड्यांसह सातारा देवळाईचा आधीच समावेश नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सुविधांचा अभाव

औरंगाबाद : देशभरातील ६२ छावणी परिसर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबई, पुण्यासह औरंगाबाद शहरातील छावणीच्या भागाचा महापालिकेत समावेश होईल. हा निर्णय झाल्यास आधीच नागरी सुविधा देण्यामध्ये दमछाक होत असलेल्या औरंगाबाद महापालिकेची डोकेदुखी वाढणार आहे.

मागील काही वर्षांमध्ये महापालिकेत शहराजवळील १८ खेडी, सिडको-हडको आणि सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. या भागात आजही शंभर टक्के मूलभूत सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. २००६ मध्ये महापालिका हद्दीत सिडको-हडकोचा समावेश केला. यापोटी मनपाला १८ कोटी रुपये देण्यात आले. मागील १२ वर्षांपासून या भागात सोयी-सुविधा देण्यात मनपा कमी पडत आहे. मनपापेक्षा सिडको प्रशासन बरे, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने सातारा-देवळाईला स्वतंत्र नगर परिषद केली. दोन दिवसांनंतर नगर परिषद रद्द करून या संपूर्ण परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला. येथील ६० ते ७० हजार नागरिकांना मनपाने काहीही सुविधा दिलेल्या नाहीत. कर्जबाजारी महापालिकेच्या ताब्यात आता छावणीचा समावेश केल्यास आणखी भार पडणार आहे. या भागात रस्ते, ड्रेनेज यंत्रणा, पथदिवे आदी दर्जेदार सोयी- सुविधा द्याव्या लागतील. छावणी परिषदेत ७ वॉर्डांचा समावेश होतो. प्रत्येक वॉर्डात ३ ते ४ हजार लोकसंख्या आहे. छावणी परिसरात सुमारे २५ ते ३० हजार नागरिक राहतात.

नागरिक आनंदीछावणी परिषदेकडून दर्जेदार मूलभूत सोयी- सुविधा दिल्या जात नाहीत. छावणीचा मनपात समावेश केल्यास किमान दर्जेदार सोयी- सुविधा तरी मिळतील, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना आहे. मागील अनेक वर्षांपासून राहणाºया नागरिकांना आजही मूलभूत सोयी मिळविण्यासाठी परिषदेच्या निधीकडे बघावे लागते.यापूर्वीही निर्णय झाला नव्हतायापूर्वीही अशा पद्धतीचा प्रस्ताव आला होता. भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनी देशभरात लाखो एकरमध्ये आहेत. त्याबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. त्याच अडचणी यावेळी येऊ शकतात. देशातील ६२ छावणी परिषदेच्या निर्वाचित सदस्यांशी संपर्क साधला आहे. यावर चर्चाही सुरू आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती शनिवारी देण्यात येईल.-करणसिंग काकस, माजी उपाध्यक्ष, छावणी परिषद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्याCentral Governmentकेंद्र सरकार