शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

वॉर्ड आरक्षणासंदर्भात औरंगाबाद महापालिकेने शपथपत्र दिल्लीला पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:59 IST

Aurangabad Municipal Corporation मनपाची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

ठळक मुद्दे२ फेब्रुवारी रोजी सुनावणीची शक्यताखंडपीठाने महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाल दिला.या निर्णयाला नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीचा वाद सध्या दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. वाॅर्ड आरक्षणासंदर्भात केलेली प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक असल्याचा दावा महापालिकेने आपल्या शपथपत्रात केला आहे. शपथपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी दिल्लीला पाठविले आहे. २ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मनपाची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तत्पूर्वी महापालिकेने आणि राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली होती. प्रभाग रचनेविषयी समीर राजूरकर व इतरांनी खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाला नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने निवडणुकीच्या आनुषंगाने परिस्थिती ‘जैसे थे’ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एस. बोपन्ना व न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर एकदा सुनावणी झाली. यात न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका राज्य निवडणूक आयोगाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्र तयार करून दिल्लीला पाठविले आहे, अशी माहिती उपायुक्त सुमंत मोरे यांनी दिली. २ तारखेपर्यंत हे शपथपत्र न्यायालयात पोहचणार असल्याचेही निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका आपल्या निर्णयावर ठामनिवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि नियमानुसार वाॅर्ड आरक्षणाची पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे केली. त्याचे चित्रिकरणही करण्यात आले. तसेच आयोगाच्या प्रतिनिधी समोरच प्रक्रिया केल्याने यात काही गैर झाले नसल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्याने काही वाॅर्ड विशिष्ट उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून तयार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वाॅर्ड आरक्षित करण्यासाठी आणि खुले करण्यासाठी सोयीनुसार प्रगणक गटांची पळवापळवी कशा पद्धतीने केली आहे, याचे पुरावे याचिकाकर्त्याने सादर केले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक