शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मिटमिटा परिसरात जाण्यास औरंगाबाद महापालिकेस अंतरिम मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:25 IST

शहरातील कचरा टाकण्यासाठी महापालिकेने मिटमिटा येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेल्या गटनंबर ३०७ आणि रहिवासी प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या गट नंबर ५४ येथे जाण्यास औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांनी शुक्रवारी पुढील आदेशापर्यंत अंतरिम मनाई केली.

औरंगाबाद : शहरातील कचरा टाकण्यासाठी महापालिकेने मिटमिटा येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेल्या गटनंबर ३०७ आणि रहिवासी प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या गट नंबर ५४ येथे जाण्यास औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांनी शुक्रवारी पुढील आदेशापर्यंत अंतरिम मनाई केली. त्याचप्रमाणे पोलिसांनी तपास कामासाठी रात्री मिटमिटा परिसरात जाऊ नये, असेही खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या विनंतीवरून सूचित केले आहे. 

मिटमिट्याच्या घटनेची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मुख्य विनंती करणार्‍या मिटमिट्याचे रहिवासी अ‍ॅड. अशोक मुळे यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. विजयकुमार डी. सपकाळ यांनी बाजू मांडली. त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, ७ मार्च रोजी विभागीय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे जी पोलीस कार्यवाही झाली त्यात जवळपास १०० पेक्षा जादा नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना पोलीस ठाण्यात डांबण्यात आले. पोलीस अधिकार्‍यांनी घरात घुसून खाजगी मालमत्तेचे नुकसान केले, तसेच महापालिकेने पोलीस बळाचा वापर करून मिटमिटा येथील  गटनंबर ३०७ आणि गटनंबर ५४ येथे शहरातील कचरा टाकला. सदर जागा ही कचरा डेपो (डम्पिंग ग्राऊंड) नसताना महापालिकेने स्वत: तेथे कचरा डेपो तयार केला. म्हणून तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावेळी याचिकाकर्त्यांनी पोलिसांच्या अतिरेकाची काही छायाचित्रे खंडपीठात सादर के ली.

तीसगावमधील प्रस्तावित कचरा डेपोविरोधात जनहित याचिकातीसगाव येथील गट क्रमांक २२७ आणि २२७/१ येथे महापालिकेचा कचरा डेपो करण्यास नागरिकांनी विरोध केलेला आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. तीसगाव येथील रहिवासी भागीनाथ आसाराम साळे व इतरांनी अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांच्या मार्फ त जनहित याचिका दाखल केली. घनकचरा निर्मूलनासाठी औरंगाबाद मनपाने सदर जागेची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. मौजे तीसगाव हे सिडको डेव्हलपमेंट झोन, एमआयडीसी आदींसाठी डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित झाले आहे. त्याठिकाणी घनकचरा निर्मूलनासाठी जागा प्रस्तावित करणे हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियमाला धरून नाही, असे याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका