शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारीतील मालमत्तांना पीआर कार्ड देण्यास औरंगाबाद महापालिका अनुकूल पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 16:52 IST

Aurangabad Municipal Corporation News शहरात सुमारे १५० गुंठेवारी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये सुमारे १ लाखपेक्षा जास्त मालमत्ता आहेत.

ठळक मुद्देप्रशासक पीआर कार्डचा प्रश्‍न सोडवणार

औरंगाबाद : गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांना पीआर कार्ड देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. नगररचना विभागाने लॉकडाऊनपूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगर भूमापन कार्यालयाला पत्र देऊन गुंठेवारीतील मिळकतधारकांना पीआर कार्ड देण्याची कार्यवाही करण्याची विनंती केली होती. मात्र, अद्यापही याबाबत संबंधित विभागांकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही.

शहरात सुमारे १५० गुंठेवारी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये सुमारे १ लाखपेक्षा जास्त मालमत्ता आहेत. मात्र, बहुसंख्य मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे बॉण्ड पेपरवर झालेले आहेत. काही शेतमालक किंवा भूमाफियांनी एनए न करताच या भागात शेतजमिनींमध्ये २० बाय ३० चे प्लॉट पाडून विक्री केली आहे. त्यामुळे हे भूखंड अधिकृत नाहीत. याच कारणाने या भागातील मिळकतधारकांना पीआर कार्डची प्रतीक्षा आहे. महापालिकेतील राजकीय मंडळींनी यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावासुद्धा केला होता. अवर सचिवांनी २० फेब्रुवारी २०२० रोजी पालिकेला पत्र पाठवून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नगररचना कार्यालयाने मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागण्याच्या पार्श्‍वभूमीवरच जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगर भूमापन कार्यालयाला शुक्रवारी पत्र पाठविले होते.

गुंठेवारीतील मिळकत धारकांना पीआर कार्ड देण्याबाबत आपल्या विभागाकडून संबंधितांना आदेशित करावे. तसेच पालिकेने गुंठेवारीअंतर्गत नियमाधिन केलेल्या भूखंड, मिळकत धारकांना गुंठेवारी नियमितीकरणाचा दाखला नकाशासह दिलेला आहे. त्यानुसार पीआर कार्ड कार्यवाही करावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या या विनंतीवर संबंधित विभागांनी अद्यापही कार्यवाही सुरू केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासक पीआर कार्डचा प्रश्‍न सोडवणारशहरातील गुंठेवारी पीआर कार्डचा प्रश्‍न सोडवला जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. लवकरच हा प्रश्‍न निकाली निघेल.- आस्तिककुमार पांडेय, प्रशासक

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग